शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा प्रदेश कार्यकारिणीची १८, १९ ला पुण्यात बैठक

By admin | Updated: June 2, 2016 00:44 IST

महापालिका निवडणुकांसाठी चार सदस्यांचा एक प्रभाग असा निर्णय सरकारने घेतल्यानंतर भारतीय जनता पक्षाने आता राज्यातील महापालिका निवडणुका जिंकण्यासाठी कंबर कसली आहे

पुणे : महापालिका निवडणुकांसाठी चार सदस्यांचा एक प्रभाग असा निर्णय सरकारने घेतल्यानंतर भारतीय जनता पक्षाने आता राज्यातील महापालिका निवडणुका जिंकण्यासाठी कंबर कसली आहे. या निवडणुकांची रणनीती ठरवण्यासाठी पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक येत्या १८ व १९ जून रोजी पुण्यात होत आहे. शिवसेनेबरोबर युती करायची किंवा नाही, याचाही निर्णय यात घेतला जाण्याची शक्यता आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वलयाचा राजकीय फायदा घ्यायचा असेल तर एक किंवा दोन सदस्यांच्या प्रभागांचा उपयोग होणार नाही. बहुसदस्यीय प्रभाग व मतदारांची संख्या जास्त असेल तर त्याचा निश्चित फायदा होईल, असा निष्कर्ष खासगी संस्थांच्या सर्वेक्षणात निघाल्यानंतर लगेचच राज्य सरकारने महापालिका निवडणुकांसाठी चार सदस्यांचा एक प्रभाग जाहीर केला. त्यानंतर आता पक्षाने या निवडणुका जिंकण्याची जबाबदारी घेतली आहे. त्यासाठीची रणनीती प्रदेश कार्यकारिणीच्या पुण्यात होणाऱ्या बैठकीत ठरवण्यात येईल.शिवसेनेबरोबरचे भाजपाचे संबंध आता मधुर राहिलेले नाहीत. त्यांची राजकीय ताकद कमी करायची एकही संधी सोडायला भाजपा तयार नाही. बहुसंख्य कार्यकर्त्यांची इच्छाही विधानसभेच्या निवडणुकांप्रमाणेच महापालिकेच्या निवडणुकाही स्वतंत्रपणे लढाव्यात, अशी आहे. यावर पुण्यातील बैठकीत विचारविनिमय होण्याची शक्यता आहे. युती करायची नाही असे ठरले तर त्याप्रमाणे कार्यकर्त्यांना सूचना देऊन कार्यरत करण्यात येईल. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीशिवाय राज्यातील अन्य काही महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार असून त्यासाठीचे ठिकाण वगैरे निश्चित करण्याच्या सूचना पक्षाच्या पुणे शाखेला दिल्या आहेत.