शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
4
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
5
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
6
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
7
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
8
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
9
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
10
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
11
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
12
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
13
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
14
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
15
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
16
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
17
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
18
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
19
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
20
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
Daily Top 2Weekly Top 5

पंधरा मिनिटांत आटोपली सभा

By admin | Updated: March 6, 2017 02:50 IST

पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शेकाप, राष्ट्रवादी, काँग्रेस, पीआरपी व रिपब्लिकन सेनेच्या महाआघाडीने घवघवीत यश प्राप्त केले

पनवेल : रायगड जिल्ह्यात पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शेकाप, राष्ट्रवादी, काँग्रेस, पीआरपी व रिपब्लिकन सेनेच्या महाआघाडीने घवघवीत यश प्राप्त केले आहे. महाआघाडीच्या यशानिमित्त विजयी मिरवणूक व भव्य सत्कार शनिवारी आयोजित करण्यात आला होता. पनवेलच्या कर्नाळा स्पोर्ट्स अकादमीपासून दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या रॅलीला प्रारंभ झाला. सायंकाळी ७ वाजता मिरवणुकीचा समारोप खारघर येथील उत्सव चौकात होणार होता. मिरवणूक रात्री पावणेदहा वाजता खारघरमध्ये आली. खूप उशीर झाल्याने निव्वळ १५ मिनिटांत आयोजकांना सभा आटोपती घ्यावी लागली. मिरवणुकीत राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे, माजी आमदार विवेक पाटील, काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष आर. सी. घरत, माजी नागराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, इंटकचे राष्ट्रीय सचिव महेंद्र घरत, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे चिटणीस श्याम म्हात्रे, शेकापचे पनवेल तालुका चिटणीस नारायण घरत, राष्ट्रवादीचे पनवेल तालुका अध्यक्ष सुनील घरत, पनवेल शहर अध्यक्ष शिवदास कांबळे, काँग्रेसचे पनवेल शहर अध्यक्ष अ‍ॅड. के. एस. पाटील आदी, पीआरपीचे महाराष्ट्र सहसचिव नरेंद्र गायकवाड, रायगड जिल्हा अध्यक्ष सीताराम गोविंद कांबळे, रिपब्लिकन सेनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष जीवन गायकवाड, अशोक गिरमकर, गुरुनाथ गायकर, मनोज शारिबन्द्रे, अजित अडसुळे, संजय घरत आदींसह शेकडोंच्या संख्येने मान्यवर मिरवणुकीत सहभागी झाले होते. पनवेल, नवीन पनवेल, खांदा वसाहत, कामोठे, कळंबोली, खारघर या मार्गे रॅली खारघरच्या उत्सव चौकात आली. या ठिकाणी बाळाराम पाटील यांच्यासह नवनिर्वाचित सदस्यांचे सत्कार संपन्न झाले. खारघर येथे ७ वाजता होणारी सभा रात्री १० वाजेपर्यंत पोहोचली. पोलिसांनी आयोजकांना सूचना दिल्या. अखेर माजी आमदार विवेक पाटील यांनी सभा आटोपती घेण्याच्या सूचना दिल्या व अगदी घाईघाईत आमदार बाळाराम पाटील व पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या सर्वच विजयी उमेदवारांचा सत्कार केला. (प्रतिनिधी)महाआघाडीच्या विजयी उमेदवारांची पनवेल ते खारघर अशी मिरवणूक काढण्यात आली. मात्र, मिरवणूक मुळातच उशिराने सुरू झाली. सायंकाळी ७ नंतर मिरवणुकीला सुरुवात झाली. मात्र, पिक अवर्समुळे अनेक भागांत मोठी वाहतूककोंडी झाली. पनवेल, नवीन पनवेल, खांदा वसाहत, कामोठे आदी ठिकाणी फिरून ही मिरवणूक खारघरमध्ये पोहोचली. मात्र, तोपर्यंत ९:४५ वाजले होते. पोलिसांनी वेळेबाबत सूचना दिल्याने महाआघाडीच्या नेत्यांनी विजयी उमेदवारांचा झटपट सत्कार करून सभा आटोपती घेतली.