शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

फेब्रुवारी अखेरपर्यंत सात स्थानकांवर वैद्यकीय कक्ष

By admin | Updated: February 11, 2016 01:50 IST

रेल्वे अपघातातील प्रवाशाला तत्काळ प्रथमोपचार उपलब्ध व्हावेत यासाठी पश्चिम रेल्वेकडून वैद्यकीय कक्ष उभारण्यात येत आहेत. सध्या

मुंबई : रेल्वे अपघातातील प्रवाशाला तत्काळ प्रथमोपचार उपलब्ध व्हावेत यासाठी पश्चिम रेल्वेकडून वैद्यकीय कक्ष उभारण्यात येत आहेत. सध्या ३ स्थानकांवर वैद्यकीय कक्ष उभारण्यात आल्यानंतर आणखी ७ स्थानकांवर फेब्रुवारी अखेरपर्यंत हे कक्ष उभारण्यात येणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली. रेल्वे अपघात झाल्यावर ताबडतोब उपचार न मिळाल्यामुळे काही प्रवाशांना प्राणास मुकावे लागते. ही परिस्थिती पाहता प्रवाशांना तत्काळ वैद्यकीय उपचार देण्याचे आदेश न्यायालयाकडून रेल्वेला देण्यात आले होते. त्यानुसार गर्दीच्या स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. या कक्षात एक डॉक्टर, नर्स आणि मदतनीस असणार असून, मध्य रेल्वेकडून नुकतेच ठाणे आणि पनवेल स्थानकात हे कक्ष सुरू करण्यात आले आहेत. पश्चिम रेल्वेकडूनही १० स्थानकांवर वैद्यकीय कक्ष उभारण्याचे नियोजन करण्यात आले होते. यासाठी काही महिन्यांपूर्वी निविदा प्रक्र्रिया राबविण्यात आल्यानंतरही त्याला प्रतिसाद मिळाला नाही. पुन्हा एकदा पश्चिम रेल्वेकडून निविदा काढण्यात आल्याने त्याला मिळालेल्या प्रतिसादानंतर नुकतीच मुंबई सेंट्रल, वांद्रे आणि गोरेगाव स्थानकात कक्ष सुरू करण्यात आले. आता उर्वरित स्थानकात वैद्यकीय कक्ष सुरू करण्याचे नियोजन पश्चिम रेल्वेने केले आहे. चर्चगेट, बोरीवली, विरार स्थानकात १६ फेब्रुवारी तर अंधेरी, कांदिवली, वसई रोड आणि पालघर स्थानकात २६ फेब्रुवारीपर्यंत हे कक्ष उभारले जातील, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी दिली. या कामासाठी ६.२0 कोटींची तरतूद असल्याचे सांंगितले. (प्रतिनिधी)