शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

‘अभिमत’चे मेडिकल प्रवेश आता ‘नीट’नेच

By admin | Updated: August 22, 2016 05:58 IST

पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे प्रवेश ‘नीट’नुसारच होणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले

मुंबई : राज्यातील अभिमत विद्यापीठातील आंग्लवैद्यक (एमबीबीएस) आणि दंतवैद्यक विद्याशाखांच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे प्रवेश ‘नीट’नुसारच होणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. या निर्णयामुळे शिक्षणसम्राटांना चांगलाच दणका बसला आहे.राज्यातील आठ अभिमत विद्यापीठांच्या दहा वैद्यकीय महाविद्यालयांमधील एमबीबीएस आणि दंतवैदक अभ्यासक्रमाच्या जागा सामाईक प्रवेश पद्धतीनुसार, परंतु ‘नीट’च्या मेरिटनुसार भरण्यात येणार आहेत. अभिमत विद्यापीठात मेडिकलच्या एकूण १८०० जागा असून, त्यापैकी ८५ टक्के म्हणजे १,५३० जागांचे वैद्यकीय प्रवेश (एमबीबीएस आणि दंतवैद्यक) ‘नीट’नुसार होतील. यापूर्वी अभिमत विद्यापीठांनी वैद्यकीय प्रवेश परीक्षेसाठी परस्पर जाहिरात काढली होती. त्यालाही सरकारनं स्थगिती दिली आहे. राज्यातील खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेश ‘नीट’नुसार करण्याचा निर्णय राज्य सरकारने यापूर्वीच घेतला असून, त्यानुसार १९ आॅगस्टपासून प्रवेश प्रक्रियाही सुरू केली आहे. खासगी वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या १७०० तर दंतवैदकच्या ४५० जागा आहेत. या जागांवरील प्रवेशांसाठी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. शिनगारे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (विशेष प्रतिनिधी)>विद्यार्थ्यांची तारांबळ मार्किंग सिस्टीममुळे विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत. वैद्यकीय शिक्षण विभागाने दिलेले दोन्ही हेल्पलाइन नंबर बंद आहेत. २४ आॅगस्ट ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख असल्याने विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली आहे.>ही आहेत अभिमत महाविद्यालयेडॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ; कोल्हापूर, पुणे, नवी मुंबईमहात्मा गांधी मिशन वैद्यकीय महाविद्यालय; औरंगाबाद आणि नवी मुंबईभारती विद्यापीठ; पुणे, सांगलीकृष्णा मेडिकल कॉलेज; कराडप्रवरा मेडिकल कॉलेज; लोणीजवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज; वर्धा