शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय शिक्षणप्रक्रिया सुलभ व्हावी

By admin | Updated: June 27, 2016 01:01 IST

शिक्षण घेण्यासाठी असणारी प्रवेशप्रक्रिया आणि त्याबाबत सुरू असणारा वाद ही सध्या आपल्या राज्यातील सर्वांत मोठी समस्या झाली

पुणे : वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेण्यासाठी असणारी प्रवेशप्रक्रिया आणि त्याबाबत सुरू असणारा वाद ही सध्या आपल्या राज्यातील सर्वांत मोठी समस्या झाली आहे. ही प्रक्रिया सुलभ आणि कायम करणे गरजेचे असल्याचे मत राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी व्यक्त केले. फेडरेशन आॅफ आॅब्स्टेट्रीक अँड गायनालॉजिकल सोसायटीज आॅफ इंडिया (एफओजीएसआय) आणि इंटरनॅशनल फेडरेशन आॅफ गायनालॉजिकल अँड आॅब्स्टेट्रीक (एफआयजीओ)च्या परिषदेत चव्हाण बोलत होते. बेस्ट प्रॅक्टिसेस, ब्रेकथ्रूज अँड करंट डिलेमाज इन आॅब्स्टेट्रीक अँड गायनालॉजी हा परिषदेचा विषय आहे.‘लोकमत’ मीडियाचे चेअरमन व खासदार विजय दर्डा, सिम्बायोसिस विश्व विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार उपस्थित होते. याबरोबरच फिगोचे अध्यक्ष सी. एन. पुरंदरे आणि फॉग्सीच्या अध्यक्ष डॉ. अलका कृपलानी, फॉग्सीच्या उपाध्यक्ष आणि परिषदेच्या अध्यक्ष डॉ. भारती ढोरे-पाटील आणि पीओजीएसचे अध्यक्ष डॉ. चारुचंद्र जोशी, डॉ. सुनीता तांदुळवाडकर, डॉ. हेमा दिवाकर, डॉ. महेश गुप्ता, पंकज सरोदे व डॉ. शांताकुमारी व अभिनेत्री ईशा कोप्पीकर उपस्थित होते. ‘‘आजही आपल्या समाजातील ग्रामीण तसेच दुर्गम भागात राहणारे नागरिक आरोग्याच्या सुविधांपासून वंचित आहेत. त्यांना योग्य त्या सेवा मिळायला हव्यात,’’ असे दर्डा यांनी सांगितले. सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहचविण्याचे महत्त्वपूर्ण काम माध्यमांनी करायला हवे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. एमक्यूआर फार्मास्युटिकलचे सतीश मेहता यांचा विशेष सन्मान करण्यात आला. डॉ. चारुचंद्र जोशी यांनी प्रास्ताविक तर डॉ. भारती ढोरे-पाटील यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)>नैतिकता योग्य पद्धतीने जपली जावी : विजय दर्डामाध्यमांची वैद्यकीय जनजागृतीमध्ये असणारी भूमिका स्पष्ट करताना खासदार विजय दर्डा म्हणाले, ‘‘माध्यमांमध्ये मोठी ताकद असून, तिचा योग्य पद्धतीने वापर होणे गरजेचे आहे. दिवसेंदिवस आरोग्याच्या समस्या वाढत असताना वैद्यकीय क्षेत्रात असणारी नैतिकता योग्य पद्धतीने जपली जाणे महत्त्वाचे आहे. व्यवसाय म्हणून वैद्यकीय पेशाकडे पाहणारा वर्ग तसेच गुन्हेगार म्हणून डॉक्टरांची निर्माण होणारी ओळख ही खेदाची बाब आहे. काही वेळा गरज नसतानाही डॉक्टरांकडून काही तपासण्या करण्यास सांगितले जाते. तसेच अत्यवस्थ रुग्णाला काही दिवस विनाकारण रुग्णालयात ठेवले जाते. या गोष्टी चुकीच्या आहेत.’’ जगातील सर्वात मोठी वैद्यकीय शिक्षणाची सुविधा भारतात असून, अत्यंत तज्ज्ञ आणि निष्णात डॉक्टर भारतात तयार होतात. पूर्वी भारतात असलेली फॅमिली डॉक्टर ही अतिशय उत्तम संकल्पना होती. मात्र, आता ही संकल्पना लोप पावत चालली आहे. सध्या कोणत्याही आजारासाठी स्पेशालिस्ट डॉक्टरकडे जाण्याचे प्रमाण वाढले आहे, हे तितके योग्य नाही.- डॉ. शां. ब. मुजुमदार