शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय शिक्षण जनकेंद्री व्हावे

By admin | Updated: May 6, 2017 02:31 IST

आजारांशी लढायचे असेल तर सर्व वैद्यकीय शास्त्रांमधील डॉक्टरांमध्ये सुसंवाद असणे आणि उपचारपद्धतींचा आदर करणे गरजेचे

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : आजारांशी लढायचे असेल तर सर्व वैद्यकीय शास्त्रांमधील डॉक्टरांमध्ये सुसंवाद असणे आणि उपचारपद्धतींचा आदर करणे गरजेचे आहे. त्यासाठी वैद्यकीय अभ्यासक्रमामध्ये संवादकौशल्याचा समावेश केला जाणार आहे. आगामी काळात वैद्यकीय शिक्षण सर्वसामान्यांना परवडणारे, सहज उपलब्ध होणारे आणि जनकेंद्रित केले जाईल, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याणमंत्री जे. पी. नड्डा यांनी केले. भविष्यात दीड लाख प्राथमिक आरोग्य केंद्रे स्वास्थ्य केंद्रांमध्ये रुपांतरित करण्याचे सूतोवाचही त्यांनी केले.सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या आरोग्य आणि जीववैद्यकीय विभागातर्फे आयोजित जागतिकीकरणावरील आरोग्य सेवेवर आधारित आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन नड्डा यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. या वेळी सिंबायोसिसचे आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे कुलपती डॉ. शां. ब. मुजुमदार, प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर, कुलगुरु डॉ. रजनी गुप्ते, डॉ. राजीव येरवडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. अ‍ॅलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेद अशा प्रत्येक वैद्यकीय शास्त्राची आपापली खासियत तसेच जमेच्या बाजू आहेत. सर्व शास्त्रांनी एकत्रितपणे आणि परस्परपूरक काम करावे लागेल. इंडियन कौैन्सिल फॉर मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) मध्ये अस्थिरोगशास्त्र आणि अक्युपंक्चर या शाखांचा समावेश करण्याची भूमिकाही घेण्यात आली. कोणत्याही आजाराच्या जीवाणू वा विषाणूला मर्यादा नसतात. मग, उपचारपद्धतींमध्ये तरी भिंती का उभ्या करायच्या, असा सवाल त्यांनी केला. पूर्वीचे आरोग्यविषयक धोरण व्याधीकेंद्रित होते. नवे आरोग्यविषयक धोरण रोगाकडून निरोगाकडे जाणारे, प्रतिबंधात्मक आणि प्रोत्साहित करणारे आहे. आरोग्य सार्वभौम आणि सर्वसमावेश करण्याचा प्रयत्न सुुरू आहे. सर्व मंत्रालयांनी परस्परसहकार्याने काम केल्यास आरोग्य मंत्रालयाचा ताण कमी होऊ शकेल. वृद्धांची काळजी, मरणासन्न रुग्णांची देखभाल आणि रुग्णांचे पुनर्वसन यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. उच्च रक्तदाब, स्तनांचा कर्करोग आदी आजारांसाठी मोठ्या प्रमाणात तपासण्या केल्या जाणार आहेत. आरोग्यविषयक धोरणामध्ये बदलती जीवनशैली, आहार, कामाच्या ठिकाणचा ताण आदी बाबींचा बारकाईने विचार करण्यात आला आहे.- जे. पी. नड्डाकेंद्रीय आरोग्य, कुटुंबकल्याणमंत्रीवैद्यकीय शिक्षणाचे स्वरुप अत्यंत महागडे आहे. भारतीय वैद्यक परिषदेतील भ्रष्टाचार पाहता, वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा सिंबायोसिसने कधीही विचार केला नाही. वैद्यकीय शिक्षणामध्ये सुधारणांची आणि अभ्यासक्रमाचा कालावधी कमी करण्याची गरज आहे. जुनी फॅमिली डॉक्टर संकल्पना पुनरुज्जीवित करण्यासाठी आणि परिचारिकांना डॉक्टरयोग्य बनवण्यासाठी अभ्यासक्रम उपलब्ध करणे आवश्यक आहे. याबाबतचे धोरण बदलेल, असे आश्वासन आरोग्यमंत्र्यांकडून मिळाले़- डॉ. शां़ ब़ मुजुमदार, डॉक्टरांनी रुग्णांना जेनेरिक औषधे लिहून देण्याबाबत शासनातर्फे सूचना देण्यात आल्या आहेत. जेनेरिक औषधांमध्ये सध्या एकत्रीकरण उपलब्ध नाही. मात्र, त्यासंदर्भात ठोस पावले उचलण्यात आली असून, भविष्यात जेनेरिक औषधांचा मार्ग सुकर करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील, असे आश्वासन जे. पी. नड्डा यांनी दिले.