शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मेडिकल कौन्सिलिंगच्या वेळापत्रकात फेरबदल!

By admin | Updated: June 6, 2014 00:51 IST

वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी लवकरच प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याचे संकेत प्राप्त झाले आहेत. वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने (डीएमईआर) प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकात फेरबदल करण्यासाठी

डीएमईआरच्या हालचाली : नवीन तारखेची लवकरच घोषणा नागपूर : वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी लवकरच प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याचे संकेत प्राप्त झाले आहेत. वैद्यकीय शिक्षण व संशोधन  संचालनालयाने (डीएमईआर) प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकात फेरबदल करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. या बदलानंतर कौन्सिलिंग प्रक्रिया  जुलै-ऑगस्टऐवजी जून महिन्यात सुरू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शिवाय ती जून महिन्याच्या तिसर्‍या आठवड्यापर्यंत पूर्ण होणार आहे.  पहिल्या टप्प्यातील प्रक्रियेनंतर विद्यार्थ्यांंना वाटप झालेल्या महाविद्यालयांत लगेच प्रवेश निश्‍चित करावा लागेल; शिवाय त्यानंतर रिक्त जागांसाठी दुसरी  फेरी घेण्यात येईल. माहिती सूत्रानुसार, डीएमईआर सोमवारपर्यंत सुधारित वेळापत्रक जाहीर करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यासाठी  डीएमईआरचे अधिकारी दिवस-रात्र प्रयत्न करीत आहेत. विशेष म्हणजे, यासंबंधी सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा आदेश जारी केला आहे. यात  मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियासह वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया आयोजित सर्व राज्यातील संबंधित यंत्रणांना प्रवेश प्रक्रियेचा कार्यक्रम  निश्‍चित करण्याचे निर्देश दिले आहेत. यानुसार मे महिन्यात कौन्सिलिंग प्रक्रिया सुरू करून, जून महिन्यात निकाल जाहीर करणे आवश्यक होते.  शिवाय २५ जूनपर्यंंत पहिल्या फेरीतील प्रवेश प्रक्रिया पूर्ण करणे अपेक्षित होते. त्यामुळे डीएमईआर सुधारित वेळापत्रक  तयार करण्याच्या कामाला  लागले असल्याची माहिती आहे. (प्रतिनिधी)अन्यथा न्यायालयाचा अवमान सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात प्रवेश प्रक्रियेला कोणताही विलंब होऊ नये, असे सांगितले आहे. तसेच निश्‍चित कार्यक्रमानुसारच प्रवेश  प्रक्रिया पूर्ण व्हावी; अन्यथा तो न्यायालयाचा अवमान समजल्या जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.