शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

मांस घेऊन जाणारा ट्रक पेटवला

By admin | Updated: September 15, 2014 04:10 IST

नगर-मनमाड रस्त्यावरून कोपरगावकडे मांस घेऊन जाणारा मालट्रक राहाता येथे तरुणांनी अडवून पेटवून दिला. संतप्त जमावाने गाडीवर दगडफेक केली.

राहाता (जि. अहमदनगर) : नगर-मनमाड रस्त्यावरून कोपरगावकडे मांस घेऊन जाणारा मालट्रक राहाता येथे तरुणांनी अडवून पेटवून दिला. संतप्त जमावाने गाडीवर दगडफेक केली. अर्ध्या तासाने आलेल्या पोलिसांनी जमावाला पांगवले. रविवारी दुपारी नगर-मनमाड महामार्गावरून एक ट्रक कोपरगावकडे जात असताना राहाता येथे ट्रकमध्ये मांस असल्याचे काही तरुणांच्या लक्षात आले. त्यामुळे संतप्त झालेल्या तरुणांनी ट्रक अडवून चालकाला याबाबत जाब विचारला. हळूहळू लोकांची गर्दी होऊ लागली. जमावाला पाहताच चालक व क्लीनर पळून गेले. त्यातच काही तरुणांनी गाडीला आग लावली. बघता बघता चारशे-पाचशे लोकांचा जमाव जमा झाला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. पोलिसांनी जमावाला पांगविण्याचा प्रयत्न केला. त्याचदरम्यान शिर्डी व राहाता नगर परिषदेच्या अग्निशमन गाड्यांना पाचारण करण्यात आले. संतप्त जमावाने या गाड्यांवरच दगडफेक केल्याने त्यांना आग विझवण्यास काही काळ व्यत्यय आला. पोलिसांनी हस्तक्षेप करून जमाव पांगविल्यानंतर अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी गाडी विझवली. राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. (वार्ताहर)