शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

एमसीएची शरणागती

By admin | Updated: May 16, 2014 05:24 IST

गेल्या तीन दिवसांपासून मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) आणि इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) यांच्यात रंगलेल्या कलगीतुर्‍यात अखेर एमसीएने शरणागती पत्करली

स्वदेश घाणेकर, मुंबई -  गेल्या तीन दिवसांपासून मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) आणि इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) यांच्यात रंगलेल्या कलगीतुर्‍यात अखेर एमसीएने शरणागती पत्करली. आयपीएलची अंतिम लढत वानखेडेवर व्हावी, यासाठी बंडाच्या तयारीत असलेल्या एमसीएने आयपीएल संचालन समितीच्या अटींच्या ‘गुगली’समोर माघार घेत वानखेडेवर शाहरुख खानच्या प्रवेशासह इतर अटीही मान्य केल्या. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय आयपीएल संचालन समितीच्या बैठकीत घेण्यात येईल, असे आयपीएल अध्यक्ष रंजीब बिस्वाल यांनी स्पष्ट केले. अंतिम लढत हवी असेल, तर आमच्या अटींची पूर्तता करा, असे खरमरीत पत्र मंगळवारी आयपीएल समितीने एमसीएला पाठवले होते. संचालन समितीने ठेवलेल्या सर्व अटी गुरुवारी दीड तास झालेल्या बैठकीत एमसीएच्या सदस्यांनी मान्य केले असून, त्या आशयाचे पत्रही त्यांना पाठविणार असल्याचे एमसीएचे उपाध्यक्ष रवी सावंत यांनी सांगितले. सर्व अटी मान्य केल्यानंतर तुम्ही शाहरुखला वानखेडेवर प्रवेश द्याल का? या प्रश्नावर सावंत म्हणाले, या अटींमध्ये सर्व संघमालकांना अंतिम सामना पाहण्याची परवानगी द्यावी, ही एक अट होती आणि तीही मान्य केली आहे. शाहरुख हा कोलकाता नाईट रायडर्स संघाचा मालक आहे, आणि तोही येऊ शकतो. मुंबईत ३ मे रोजी वानखेडेवर काही प्रमुख व्यक्तींना सुरक्षेच्या कारणास्तव स्टेडियमबाहेर ताटकळत बसावे लागले होते आणि त्यात पार्किंगची सोय नसल्याने मनस्ताप सहन करावा लागला होता. या सर्व प्रकाराची गंभीर दखल घेत आयपीएल संचालन समितीने तत्काळ बैठक घेऊन अंतिम सामना बंगळुरूला हलवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाने अचंबित झालेल्या एमसीए पदाधिकार्‍यांनी अंतिम सामना हलविणार असाल, तर इतरही सामने नकोत, असाच पवित्रा घेतला आणि एमसीएचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे साकडे घातले. तरीही आयपीएल समितीने अटींचे पत्र पाठवून एमसीएची पुरती कोंडी केली होती.