शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
2
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
3
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
4
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झाली? 'या' एका नंबरवर कॉल करा, तुमचे पैसे परत मिळतील!
5
धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या
6
'चला हवा येऊ द्या'मध्ये अभिजीत खांडकेकरने रिप्लेस केल्यावर निलेश साबळेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
7
सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video
8
PC Jewellers Share Price: कर्जमुक्त होणार ही ज्वेलरी कंपनी, शेअरमध्ये १६ टक्क्यांची तुफान तेजी; गुंतवणूकदार सुखावले, तुमच्याकडे आहे का?
9
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...', ऑपरेशन सिंदूरबाबत उपसेनाप्रमुखांचा मोठा खुलासा
10
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
11
UIDAI चा मोठा निर्णय! 'या' चुका केल्यास तुमचं आधार कार्ड रद्द होईल, आताच तपासा!
12
मराठ्यांचा इतिहास लोकांपर्यंत पुरेसा पोहचला नाही, इंग्रजांसह स्वकीयही जबाबदार- मुख्यमंत्री फडणवीस
13
"मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा.…’’, प्रसिद्ध व्यावसायिकाने राज ठाकरेंना डिवचले  
14
“कोकणच्या हिताचे चांगले काम करा, टीकेत अडकून राहू नका”; भास्कर जाधवांचा योगेश कदमांना सल्ला
15
Maharashtran Rains: दक्षिण मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता 
16
तेजीनंतर पुन्हा सोन्या-चांदीच्या दरात घसरण, तरीही चांदी १.१० लाखांच्या पार; खरेदीपूर्वी पाहा नवे दर
17
PM मोदींना त्रिनिदादमध्ये सोहरीच्या पानावर वाढलं गेलं जेवण; भारताशी कनेक्शन अन् फायदे काय?
18
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
19
IND vs ENG: बॅटने कहर केल्यानंतर आता बॉलने इतिहास रचण्याची संधी, जाडेजाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष!
20
तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक

एमसीए घडवणार गोलंदाज

By admin | Updated: July 10, 2015 02:45 IST

मुंबई क्रिकेटने आजवर अनेक प्रतिभावंत व जागतिक कीर्तीचे फलंदाज देशाला मिळवून दिले. त्या तुलनेत गोलंदाज मात्र खूपच कमी तयार झाले.

मुंबई : मुंबई क्रिकेटने आजवर अनेक प्रतिभावंत व जागतिक कीर्तीचे फलंदाज देशाला मिळवून दिले. त्या तुलनेत गोलंदाज मात्र खूपच कमी तयार झाले. मुळात भारतीय संघाच्या गोलंदाजीच्या मर्यादादेखील जगजाहीर आहे. या सर्व गोष्टींचा गांभीर्याने विचार करून मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) गुरुवारी ‘बॉलिंग फाउंडेशन’ची स्थापना केल्याची घोषणा केली आणि याद्वारे मुंबई व भारतीय क्रिकेटला उत्कृष्ट वेगवान व फिरकी गोलंदाज मिळवून देण्याचा निर्धार केला आहे. विशेष म्हणजे या उपक्रमासाठी आॅस्टे्रलियाचे माजी मध्यमगती दिग्गज गोलंदाज जेफ थॉमसन यांंच्यावर नवोदितांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.या उपक्रमातून मुंबईसाठी पुन्हा एकदा भरारी मिळवून देण्यास फायदा होणार असल्याचे सांगताना एमसीए उपाध्यक्ष व माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांनी सांगितले की, या उपक्रमामध्ये युवा गोलंदाजांना केवळ थॉम्पसन यांचे मार्गदर्शन मिळणार नसून, देशांतर्गत स्पर्धेत मुंबईकडून चमकलेल्या अनुभवी गोलंदाजांचेदेखील मार्गदर्शन मिळेल. यामध्ये अ‍ॅबी कुरविल्ला, पारस म्हांबरे, साईराज बहुतुले यांसारख्या गोलंदाजांचा समावेश असेल. दरम्यान, यामध्ये फिरकी गोलंदाजांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी बहुतुले यांच्याकडे असेल. कोणताही सामना जिंकण्यास उत्कृष्ट गोलंदाज असणे गरजेचे असते. देशांतर्गत क्रिकेटमधील विविध वयोगटाच्या स्पर्धांमध्ये मुंबईला गुणवान गोलंदाज मिळवून देण्यास या उपक्रमाचा फायदा होईल, असेही वेंगसरकर यांनी सांगितले. १३ जुलैपासून सुरू होणारे हे प्रशिक्षण ३१ मे २०१७पर्यंत सुरू राहणार असून, एमसीएची निवड समिती १९ वर्षांवरील ३० वेगवान व ३० फिरकी गोलंदाजांची या शिबिरासाठी निवड करेल. तसेच हे शिबिर बांद्रा - कुर्ला संकुलातील शरद पवार बंदिस्त स्टेडियममध्ये पार पडेल.