शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

महापौरांना मनपाचाच ‘ताप’

By admin | Updated: August 13, 2014 00:55 IST

महापालिकेच्या कर विभागाला कुणाचाही ‘डर’ उरलेला दिसत नाही. बेदरकारपणे विभागाचे काम सुरू आहे. अतिक्रमण कारवाईत हटविलेल्या घरांनाही कर विभागाने कराची डिमांड जारी केले आहे.

वाढीव टॅक्स बिल दिले : कर विभागाचा कारनामा नागपूर : महापालिकेच्या कर विभागाला कुणाचाही ‘डर’ उरलेला दिसत नाही. बेदरकारपणे विभागाचे काम सुरू आहे. अतिक्रमण कारवाईत हटविलेल्या घरांनाही कर विभागाने कराची डिमांड जारी केले आहे. एवढेच नव्हे तर महापौर अनिल सोले यांनी विधान परिषद निवडणुकीपूर्वी मालमत्ता कर भरला असतानाही त्यांना दोन वर्षांचा कर थकीत असल्याचे दाखवून कराची डिमांड पाठविण्याचा कारनामा कर विभागाने केला आहे. यावरून कर विभाग किती सक्षमपणे काम करीत याचे याची प्रचिती आली आहे. कर विभाग दरवर्षी कराच्या डिमांड जारी करतो. हजारो नागरिकांना कराची डिमांड मिळतच नाही. जागरुक नागरिक झोन कार्यालयात जाऊन चौकशी करतात. कर भरतात. तेव्हा त्यांना हाताने लिहिलेली पावती दिली जाते. भरलेल्या कराची संगणकीकृत नोंदणी त्याचवेळी केली जात नाही. त्यामुळे कराचा भरणा केल्यानंतरही संगणकाच्या रेकॉर्डमध्ये कर थकीत दाखविला जातो. पुढील वर्षी हा थकीत कर जोडून डिमांड पाठविली जाते. ज्या नागरिकांकडे गेल्यावर्षीची कर भरल्याची पावती असेल ती त्यांना दाखवावी लागते. त्यानंतर थकीत कर कमी केला जातो. मात्र, जर संबंधिताकडून जुनी पावती गहाळ झाली असेल तर मात्र, त्यालाच कर भरल्याचा पुरावा मागितला जातो. कर विभागात असा प्रताप नित्यनेमाने सुरू आहे. असाच प्रकार महापौर अनिल सोले यांच्याबाबतही घडला. महापौर सोले यांनी विधान परिषद निवडणुकीपूर्वी कर भरला. मात्र, त्यानंतरही नुकतीच त्यांना दोन वर्षाचा कर थकीत असल्याची डिमांड पाठविण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महापौर सोले यांनी ही बाब कर विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर कर विभाग खडबडून जागा झाला. दिलेली डिमांड परत घेऊन थकबाकी शून्य दाखवून चालू वर्षाची डिमांड जारी केली व हे प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला. पुढे महापौर सोले यांनीही आपण स्वत: महापालिकेचा एक भाग असल्यामुळे याची वाच्यता केली नाही. मात्र, सहकाऱ्यांच्या चर्चेतून हा विषय शेवटी समोर आला. एवढ्यावरच कर विभाग थांबलेला नाही. हटविलेल्या वस्तीलाही कराच्या डिमांड जारी केल्या आहेत. सक्करदरा तलावाजवळील बॉलिवूड उद्यानासाठी सुमारे ५०० झोपड्या हटविण्यात आल्या. याला चार वर्षे झाली. असे असतानाही कर विभागाने या झोपड्यांना कराची डिमांड जारी केली आहे. यावरून झोन स्तरावर मालमत्तांचे आकलन व्यवस्थित होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पाचशे मालमत्ताधारकांनी कर भरला नाही, अशी माहिती कर विभागाला मिळाली. याची चौकशी केली असता संबंधित झोपडीधारक काही वर्षांपासून तेथे राहतच नसल्याचे आढळून आले. (प्रतिनिधी)डिमांड वितरणात खबरदारी घ्या- देशमुखकरवसुली व संकलन समितीचे अध्यक्ष गिरीश देशमुख यांना याची माहिती मिळाली. त्यांनी संबंधित डिमांड निरस्त करण्याचे निर्देश कर विभागाला दिले. देशमुख यांनी सांगितले की, डिमांड नोट वितरणात खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मालमत्ताधारक दुसरीकडे वास्तव्यास गेले असल्यास त्यांच्या पत्त्यात सुधारणा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. खुले भूखंड असलेल्या ९०० जणांना डिमांड नोट पाठविण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.