शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकच्या उद्दामपणाला "मनसे" दणका, बसवर लिहून पाठवलं "जय महाराष्ट्र"

By admin | Updated: May 23, 2017 17:16 IST

"बेळगावसह सीमा भागांत महापालिका, नगरपालिका अथवा विधानसभा सदस्यांना यापुढे "जय महाराष्ट्र" हे शब्द उच्चारण्यावर बंदी घालू " अशी मुजोरीची भाषा

ऑनलाइन लोकमत

ठाणे, दि. 23 - "बेळगावसह सीमा भागांत महापालिका, नगरपालिका अथवा विधानसभा सदस्यांना यापुढे "जय महाराष्ट्र" हे शब्द  उच्चारण्यावर बंदी घालू " अशी मुजोरीची भाषा कर्नाटकचे नगरविकास मंत्री रोशन बेग यांनी वापरली होती. त्याबाबत तीव्र प्रतिक्रिया आता महाराष्ट्रात उमटायला सुरूवात झाली आहे. रोशन बेग यांना प्रत्युत्तर म्हणून ठाण्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष अविनाश जाधव यांनी कर्नाटक राज्य परिवहनच्या बसवर ठळक अक्षरांत "जय महाराष्ट्र"  लिहून त्या बस कर्नाटकला रवाना केल्या. तर, दादर येथील कर्नाटक संघच्या  नावाला आज स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काळे फासले आहे. 

सीमाभागातील मराठी भाषिकांची गळचेपी करणा-या कर्नाटक सरकारने टोकाचं पाऊल उचललं आहे. "जय महाराष्ट्र" ही घोषणा दिल्यास घोषणा देणा-या लोकप्रतिनिधींचं पदच रद्द करण्याचा इशारा कर्नाटक सरकारने दिला आहे. लोकप्रतिनिधींनी जय महाराष्ट्र बोलल्यास किंवा कर्नाटकविरोधात घोषणा दिल्यास पद रद्द करण्याचा इशारा नगरविकास मंत्री रोशन बेग यांनी दिला आहे.

लोकप्रतिनिधींनी सार्वजनिक कार्यक्रमात किंवा सभागृहात जय महाराष्ट्र किंवा कर्नाटकविरोधात घोषणा दिल्यास पद रद्द करण्याचा कायदा आणण्याची तयारी सुरू आहे, आगामी अधिवेशनात असं घडल्यास त्या लोकप्रतिनिधींचं पद रद्द केलं जाईल  अशी माहिती बेळगाव दौ-यावर आलेले रोशन बेग यांनी दिली. बेळगाव महापालिका सभागृहात याबाबत बैठक घेणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. 
 
सीमाभागातील मराठी भाषिकांचा आवाज दाबण्यासाठी कर्नाटक सरकारचा हा प्रय़त्न असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे  एकीकडे अल्पसंख्यांक घटनात्मक अधिकार देण्यास टाळाटाळ सुरु असताना, एकीकरण समितीच्या लोकप्रतिनिधींची अशीही गळचेपी होणार आहे.  दरम्यान कर्नाटक सरकारच्या या निर्णयाचा परिणाम सीमाभागावर पाहायला मिळण्याची शक्यता आहे. 
 
दुसरीकडे शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गो-हे यांनी यावर प्रतिक्रिया देताना हा तालिबानी निर्णय असल्याचं म्हटलं आहे. याबाबत राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी दखल द्यावी असं त्या म्हणाल्या.