शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दुपारपर्यंत समजणार मावळचा खासदार

By admin | Updated: May 16, 2014 04:29 IST

मावळ लोकसभा मतदारसंघाचा निवडणूक निकाल जाहीर होण्यास काही तासांचाच अवधी उरला आहे. निकालाबाबतची उत्कंठा शिगेला पोहोचली असून, सकाळी आठला मतमोजणी सुरू होऊन दुपारी साडेबारापर्यंत चित्र स्पष्ट होईल.

पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघाचा निवडणूक निकाल जाहीर होण्यास काही तासांचाच अवधी उरला आहे. निकालाबाबतची उत्कंठा शिगेला पोहोचली असून, सकाळी आठला मतमोजणी सुरू होऊन दुपारी साडेबारापर्यंत चित्र स्पष्ट होईल. मावळ मतदारसंघातील संपूर्ण निकाल दुपारी २पर्यंत अधिकृतरीत्या जाहीर होईल. मतमोजणीसाठी प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. महिन्याभरापासून कोण विजयी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मावळात कोण बाजी मारणार, देशात कोणाची सत्ता येणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. ही प्रतीक्षा संपत आली आहे. नागरिकांना लागलेली ही उत्कंठा काही तासांनंतर संपुष्टात येणार आहे. कार्यकर्ते आणि नेत्यांची रात्र जागरणात गेली. मावळसह शिरूर मतदारसंघाची मोजणी बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथील बॅडमिंटन हॉलमध्ये होणार आहे. प्रत्यक्ष मोजणीस सकाळी आठला सुरुवात होईल. प्रथम टपालाद्वारे आलेल्या मतांची मोजणी होणार आहे. त्यानंतर विधानसभानिहाय एकूण ८४ टेबलावर मोजणीस सुरुवात होईल. विधानसभानिहाय मतदान केंद्राच्या संख्येनुसार मोजणीच्या २६ फेर्‍या होतील. दुपारी दोनपर्यंत अधिकृत निकाल जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. यासाठी निवणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. विजयाच्या खात्रीने प्रमुख दावेदारांनी विजयोत्सवाची जय्यत करण्याची तयारी केली आहे. विजयी मिरवणुकीसाठी ढोल-ताशे, बॅन्डपथक बुक केले आहे. गुलाल, भंडार्‍याच्या पोत्यांची मोठी साठवण करण्यात आली आहे. तसेच, झेंडे व चिन्ह सजवून ठेवले आहेत. अनेकांना या मिरवणुकीत सामील होण्याचे निमंत्रण दिले जात आहे. व्हॉट्स अ‍ॅप व फेसबुक या सोशल नेटवर्कवर अभिनंदनाचा वर्षाव करीत आनंद सोहळ्यात सामील होण्याचे आवाहन केले जात आहे. मावळात कोण बाजी मारणार, कोण किती मते घेणार अशी उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.(प्रतिनिधी)