शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

माटुंगा लेबर कॅम्प कडकडीत बंद

By admin | Updated: November 10, 2014 03:37 IST

पाथर्डी तालुक्यातील जवखेडे दलित हत्याकांडाच्या निषेधार्थ माटुंगा लेबर कॅम्पमधील आंबेडकरी कार्यकर्त्यांनी रविवारी कडकडीत बंद पाळला

मुंबई : पाथर्डी तालुक्यातील जवखेडे दलित हत्याकांडाच्या निषेधार्थ माटुंगा लेबर कॅम्पमधील आंबेडकरी कार्यकर्त्यांनी रविवारी कडकडीत बंद पाळला. नागरिकांनी विभागात शांततेच्या मार्गाने मोर्चा काढून हत्याकांडाचा निषेध नोंदवला. हत्याऱ्यांवर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन मोर्चेकऱ्यांनी शाहू नगर पोलिसांना दिले.आंबेडकरी चळवळीचा बाल्लेकिल्ला अशी ओळख असलेल्या माटुंगा लेबर कॅम्पमधील आंबेडकरी कार्यकर्त्यांनी दलित हत्याकांडाच्या निषेधार्थ बंदमध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. दुपारी १२ वाजता डॉ. आंबेडकर रोडवरील बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शांततेच्या मार्गाने मोर्चा सुरू झाला. काळे झेंडे हाती घेऊन नागरिकांनी घोषणाबाजी करीत घटनेचा निषेध नोंदवला. समता नगर, शाहू नगर आणि माटुंगा लेबर कॅम्प परिसरात मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात स्थानिक आमदार वर्षा गायकवाड, माजी खासदार एकनाथ गायकवाड, नगरसेवक विष्णू गायकवाड, माजी आमदार बाबूराव माने, संजय भालेराव, उषाताई करकटे, कांताबाई काळे, अनिल वाघमारे, सूरज डुलगज, बिल्लू चावरिया, अशोक बागुल, गौतम साळवे, सुभान भाई, मनसुखभाई आदी मान्यवरांसह विभागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. विभागात मोर्चा काढल्यानंतर मोर्चेकऱ्यांनी शाहू नगर पोलीस ठाण्यात अधिकाऱ्यांना निवेदन दिले. (प्रतिनिधी)