शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

मॅटच्या फटक्याने आरोग्य विभाग जागा

By admin | Updated: November 5, 2014 04:33 IST

राज्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी असणाऱ्या सार्वजनिक आरोग्य विभागातील अनागोंदी व अन्यायकारक कार्यपद्धतीबाबत उच्च न्यायालय व मॅटकडून वारंवार मिळणाऱ्या फटकाऱ्यानंतर आता विभागाला जाग आली आहे

जमीर काझी , मुंबईराज्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी असणाऱ्या सार्वजनिक आरोग्य विभागातील अनागोंदी व अन्यायकारक कार्यपद्धतीबाबत उच्च न्यायालय व मॅटकडून वारंवार मिळणाऱ्या फटकाऱ्यानंतर आता विभागाला जाग आली आहे. या अधिकाऱ्यांमुळे विविध खटल्यांमध्ये प्रशासनाची बाजू नीटपणे मांडली न गेल्याने विरोधात गेलेल्या निकालासाठी आता संबंधित अधिकाऱ्याला जबाबदार धरले जाणार आहे. कोर्टाने विविध प्रकरणांमध्ये ठोठावलेल्या आर्थिक दंडाची भरपाई संबंधित अधिकाऱ्याकडून केली जाणार आहे. तसेच न्यायालयीन प्रकरणांसाठी नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. आरोग्य विभागात कार्यरत असलेले अधिकारी, कर्मचारी हे पदोन्नती, बदली, वेतनवाढ किंवा अन्य बाबींमध्ये आपल्यावर अन्याय झाल्याच्या भावनेतून महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरण (मॅट) किंवा उच्च न्यायालयात धाव घेतात, त्या वेळी संबंधित कोर्टाकडून विभागाकडे त्याबाबतचा अभिप्राय किंवा अ‍ॅफिडेव्हिट निर्धारित मुदतीमध्ये सादर करण्याची सूचना केली जाते. पण काही प्रकरणांत योग्य प्रकारे बाजू न मांडल्यामुळे निकाल विरोधात लागतो. तर अनेक वेळा आर्थिक दंड ठोठावला जातो. त्यामुळे भविष्यात याबाबतची प्रकरणे दक्षतापूर्वक हाताळण्याचे आदेश आरोग्य विभागाच्या सचिवांनी दिले आहेत. त्यासाठी आरोग्य विभागातील संचालक, विभागीय स्तरावरील उपसंचालक कार्यालयातील मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्याला या प्रकरणी कार्यवाही करण्यासाठी नोडल अधिकाऱ्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. काय असेल नोडल अधिकाऱ्यांचे काम? हे नोडल अधिकारी कोर्टामध्ये विहित मुदतीमध्ये दाखल करावयाचे अभिप्राय, शपथपत्रांबाबतचा (अ‍ॅफिडेव्हिट) आढावा घेणार आहेत. संबंधित कार्यालयातील मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्यावर त्याची जबाबदारी सोपविण्यात आलेली असून, त्यांनी दर आठवड्याला त्याचा आढावा घ्यावयाचा आहे.