शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

मातोश्रीवर राज, उद्धवची 'बंधू' भेट

By admin | Updated: July 29, 2016 12:52 IST

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 4 वर्षानंतर आपले बंधू आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची शुक्रवारी मातोश्रीवर जाऊन भेट घेतली

ऑनलाइन लोकमत - 
मुबंई, दि. 29 - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 4 वर्षानंतर आपले बंधू आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची शुक्रवारी भेट घेतली. राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. तब्बल सव्वा तास राज आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एका खोलीत बसून चर्चा केली तसंच एकत्र जेवण केल्याचीही माहिती मिळाली आहे. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्याही शुभेच्छा दिल्या. तसंच निघण्याआधी बाळासाहेब ठाकरेंच्या प्रतिमेचं दर्शनही घेतलं. मात्र राज ठाकरेंच्या भेटीमागचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. 
 
राज ठाकरेंच्या अचानक भेटीमुळे अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. येणा-या महापालिका निवडणुकांवर चर्चा करण्यासाठी ही भेट असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दुसरीकडे  शिवसेना आणि भाजपामध्ये गेले काही दिवस शाब्दिक चकमक सुरु आहे. उद्धव ठाकरे यांनीदेखील गरज लागल्यास सत्तेतून बाहेर पडू असा इशारा दिला होता. त्यामुळे सत्तेतून बाहेर पडल्यास आपली रणनीती ठरवण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची भेट असावी अशीही शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीत मनसे - शिवसेना युती होईल असे अंदाज वर्तवले होते, मात्र तेव्हा चुकलेली वेळ आत्ता साधून येते का ? हे पाहावं लागेल.
  
बाळासाहेब ठाकरेंचा संपत्ती वाद आणि उद्धव ठाकरे- जयदेव ठाकरे यांच्यातील न्यायालयीन लढाई या पार्श्वभूमीवरही ही भेट असल्याचा अंदाज राजकीय विश्लेषकांनी वर्तवला आहे.
 
राज - उद्धव ठाकरेंच्या भेटीचा इतिहास - 
 
23 नोव्हेंबर 2008 -  राज ठाकरे बाळासाहेबांची पुस्तकं परत करण्याच्या निमित्ताने मातोश्रीवर दाखल झाले होते. त्यावेळी उद्धव आणि राज यांची भेट झाली होती.
 
16 जुलै 2012 - उद्धव ठाकरेंना छातीत दुखू लागल्याने राज ठाकरे लिलावती रुग्णालयात भेटीला पोहोचले होते. राज ठाकरे यांनी कुटुंबासह उद्धव ठाकरे यांची लिलावती रुग्णालयात भेट घेतली होती. प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी राज यांनी पत्नीसह उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. 
 
20 नोव्हेंबर 2012 - बाळासाहेबांच्या अस्थिकलशाच्या दर्शनावेळी शिवाजी पार्कवर राज-उद्धव एकत्र
 
3 नोव्हेंबर 2014 - राज ठाकरेंच्या मुलीला अपघात, उद्धव ठाकरे भेटीला गेले असताना राज यांची भेट
 
17 नोव्हेंबर 2014 - बाळासाहेबांच्या स्मृतीदिनाला शिवतीर्थावर राज-उद्धव एकत्र