शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

माथेरानच्या पॉइंट्सला गतवैभव मिळणार!

By admin | Updated: April 6, 2017 02:48 IST

निसर्गसौंदर्याने नटलेल्या माथेरानचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे येथील रमणीय पॉइंट्स आहेत

माथेरान : निसर्गसौंदर्याने नटलेल्या माथेरानचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे येथील रमणीय पॉइंट्स आहेत. मागील २६ जुलैच्या अतिवृष्टीमध्ये अनेक महत्त्वाच्या पॉइंट्सची वाताहात झाली होती. परिणामी, हे मुख्य पॉइंट्स नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याने इतिहास जमा होतात की काय, ही भीती स्थानिकांसह पर्यटकांनाही होती. यासाठी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने, तसेच अन्य पक्षांतील मंडळींनी मुंबई महाराष्ट्र प्राधिकरण विकास मंडळाकडे या पॉइंट्सच्या सुशोभीकरणासाठी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर अखेरीस या कामाचा शुभारंभ नुकताच पार पडला आहे.शिवसेना शहरप्रमुख चंद्रकांत चौधरी,विद्यमान नगरसेवक तथा गटनेते प्रसाद सावंत, तसेच प्रभाग एक मधील नागरिक लक्ष्मण कदम यांच्या हस्ते विविध पॉइंट्सच्या दुरु स्ती कामाचे, तसेच महत्त्वाकांक्षी कामाचा शुभारंभ प्रभाग एक मधील इंदिरा गांधीनगर भागातील मायरा पॉइंटजवळ श्रीफळ वाढवून करण्यात आला. याप्रसंगी एमएमआरडीएचे अधिकारी ढाणे व अन्य अधिकारी, तसेच नगराध्यक्षा प्रेरणा प्रसाद सावंत, उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर,विरोधी पक्षनेते शिवाजी शिंदे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. माथेरानला नेहमीच विकासकामे करताना वनविभागाच्या अखत्यारीत असलेल्या जागेमुळे आडकाठी होत असते. यासाठी महसूल व वनविभागाने मागील आठवड्यात एक विशेष बैठक घेऊन यावर तोडगा काढण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असल्याचे समजते. पुढील महिन्यात नेरळ -माथेरान घाट रस्त्याच्या कामास सुरु वात होणार आहे. यामध्ये वनखात्याची जेवढी जमीन विकासकामांसाठी वापरण्यात येणार आहे. तितक्याच प्रमाणात महसूल जागेवर वनीकरण करण्याची अट सरकारच्या जी.आर.मध्ये नमूद केली असल्याने त्या अनुषंगाने एमएमआरडीए घाट रस्त्यांसाठी वनखात्याची एक हेक्टर जमीन वापरणार आहे. त्याच बदल्यात तेवढ्याच क्षेत्रात वनीकरण करण्यात येणार आहे. तीन वर्षांपूर्वी माथेरानच्या संपूर्ण विकासकामांसाठी १२३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. यामध्ये नेरळ-माथेरान घाटासाठी २७ कोटी, दस्तुरी ते पांडे रस्त्यापर्यंतच्या मुख्य रस्त्यांसाठी ४९ कोटी आणि महत्त्वाच्या पॉइंट्सच्या सुशोभीकरणासाठी ४७ कोटी रु पये निधी मंजूर करण्यात आला होता; परंतु वनखात्याची अडचण येत असल्याने या कामास उशिराने सुरु वात होत आहे. मागील काळात या संपूर्ण प्रक्रि येत येथील महत्त्वाचे असणारे पॅनोरमा पॉइंट, मायरा,गार्बट व अन्य पॉइंट्सची नव्याने दुरु स्ती करून पर्यटकांच्या दिमतीला लवकरच सज्ज होणार असल्याने स्थानिकांसह पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. (वार्ताहर)>येथील पर्यटनाचा मुख्य कणा हा एकमेव पर्यटक असल्याने त्यांना मुख्य पॉइंट्सची सैर करून निसर्गशोभा न्याहाळता यावी. येथील सर्वसामान्य मोलमजुरांचा याचनिमित्ताने व्यवसाय वृद्धिंगत व्हावा, या उद्देशाने आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. येथील पर्यटनक्र ांती घडावी, हे आमचे स्वप्न आहे. ते प्रत्यक्षपणे कृतीत साकारणार आहोत. - प्रसाद सावंत, गटनेते, माथेरान नगरपरिषदमाथेरानच्या लोकप्रतिनिधींनी गेल्या सहा महिन्यांपासून घाटाचे काम सुरू व्हावे म्हणून पाठपुरावा केला होता. घाट रस्त्याचा एकूण २५ कोटी रु पयांचा प्रकल्प असून, सुरक्षित घाट रस्ता तयार झाल्यास पर्यटकांची संख्या वाढणार आहे. - सुनील शिंदे, प्राध्यापक, माथेरानतीन वर्षांपूर्वी माथेरानच्या संपूर्ण विकासकामांसाठी १२३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता.नेरळ-माथेरान घाटासाठी २७ कोटी निधी मंजूर.