शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

माथेरानची मिनी ट्रेन पुन्हा धावणार!

By admin | Updated: August 25, 2016 06:04 IST

मिनी ट्रेन बंद करण्याचा रेल्वेचा कोणताही विचार नसल्याचे मध्य रेल्वे विभागीय व्यवस्थापक रवींद्र गोयल यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले.

मुंबई : ‘माथेरानची राणी’ म्हणून ओळखली जाणारी मिनी ट्रेन बंद करण्याचा रेल्वेचा कोणताही विचार नसल्याचे मध्य रेल्वे विभागीय व्यवस्थापक रवींद्र गोयल यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले. या ट्रेनची दोन इंजिन नेरळ येथून क्रेनच्या सहाय्याने ट्रकमध्ये टाकून नेण्यात आले. त्यानंतर, अनेक तर्कवितर्कांना उधाण आले होते. याबाबत बोलताना हे इंजिन दार्जिलिंग येथे अद्ययावत करण्यासाठी पाठविण्यात आले आहे. त्यामुळे ही ट्रेन लवकरच सुरू करण्यात येईल, अशी माहिती गोयल यांनी दिली. मंगळवारी नेरळ येथे उभ्या असलेल्या या ट्रेनचे दोन इंजिन एका मोठ्या ट्रकमध्ये ठेवून नेण्यात आले. त्यामुळे मिनी ट्रेन बंद होत असल्याचे वृत्त सर्वत्र पसरले. यासंदर्भात मध्य रेल्वे विभागीय व्यवस्थापक रवींद्र गोयल यांनी सांगितले की, मिनी ट्रेन बंद होत असल्याची माहितीत तथ्य नाही. इंजिन अद्ययावत करण्यासाठी दार्जिलिंगला पाठविण्यात येत आहेत. अद्ययावत तंत्रज्ञान जोडून ती पुन्हा माथेरानला आणली जातील. या आधीही दोन इंजिन तेथील कार्यशाळेत नेण्यात आल्याचे गोयल म्हणाले. त्याचप्रमाणे, या ट्रेनच्या डब्यांमध्येही हवेच्या दाबावर चालणारे ब्रेक बसविण्यात येतील आणि त्याचे काम सुरू आहे. रुळांमधील अडचणी, संरक्षक भिंत अशी काही कामे पूर्ण करून मिनी ट्रेन पुन्हा सुरू करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)