शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई महापालिकेचा पैसा मातोश्रीवर

By admin | Updated: April 2, 2015 05:06 IST

मुंबई महापालिकेत गेल्या २२ वर्षांपासून सत्तेवर असलेल्या शिवसेनेने शहराच्या विकासाऐवजी जनतेचा पैसा ‘मातोश्री’वर जमा करण्यात धन्यता मानली जाते. म

मुंबई : मुंबई महापालिकेत गेल्या २२ वर्षांपासून सत्तेवर असलेल्या शिवसेनेने शहराच्या विकासाऐवजी जनतेचा पैसा ‘मातोश्री’वर जमा करण्यात धन्यता मानली जाते. महौपारांच्या स्टिंग आॅपरेशनमधून ही बाब चव्हाट्यावर आलेली आहे. त्यांच्या सगळ्या भानगडी जनतेसमोर आणणार आहोत, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री व वांदे्र (पू़) मतदारसंघातील कॉँग्रेसचे उमेदवार नारायण राणे यांनी केले.वांद्रेतील प्रचारसभेत बोलताना त्यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती हल्ला चढवित भाजपा-सेनेने जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप केला. राणे म्हणाले, की मुंबई महानगरपालिकेत अनेक वर्षे सत्ता उपभोगत असताना शिवसेनेने शहराच्या मूलभूत समस्या सोडविलेल्या नाहीत. उदरनिर्वाहाचे साधन बनवून जनतेचा पैसा उद्धव ठाकरे व अन्य नेत्यांची लुबाडला आहे. शिवसेनाप्रमुखांनी प्रत्येक सैनिकाला स्वाभिमानाने जगण्याचे शिकविले, मात्र उद्धव ठाकरे लाचारीचे जिणे जगत आहेत. त्यांच्या महापौरच टक्केवारीची भाषा करीत असतील तर तेथे विकास कसा होणार?या सर्वांनी टक्केवारीतून स्वत:च्या तुंबड्या भरून घेतल्या. बाळासाहेबांनी या पक्षाला कष्टाने वाढवले, मात्र आता या पक्षात पैसे घेऊन तिकिटे दिली जातात. जेथे उमेदवारांनाच तिकिटासाठी पैसे मोजावे लागतात त्यांच्याकडून सामाजिक कामाची काय अपेक्षा ठेवणार? मी केलेला दावा फेटाळल्यास अशाप्रकारे तिकीट मिळविलेल्या ५० जणांची यादी जाहीर करणार असल्याचे त्यांनी जाहीरकेले. (प्रतिनिधी)