शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यालाच ३ हजार कोटींची गरज

By admin | Updated: December 30, 2015 00:47 IST

मागील तीन वर्षांपासून मराठवाड्याला दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. केंद्र आणि राज्य शासनाकडून दरवर्षी पॅकेज जाहीर होतात. यंदाही केंद्राने ३१०० कोटींचे पॅकेज जाहीर केले.

औरंगाबाद : मागील तीन वर्षांपासून मराठवाड्याला दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. केंद्र आणि राज्य शासनाकडून दरवर्षी पॅकेज जाहीर होतात. यंदाही केंद्राने ३१०० कोटींचे पॅकेज जाहीर केले. केंद्राची आर्थिक मदत संपूर्ण राज्यासाठी आहे. एकट्या मराठवाड्याचीच गरज यंदा तीन हजार कोटींची आहे. केंद्राच्या पॅकेजमध्ये राज्य शासन आपला वाटा किती टाकणार यावर दुष्काळवाड्या मराठवाड्याचे ‘गणित’अवलंबून आहे.मराठवाड्यात दुष्काळाची दाहकता दरवर्षी हळूहळू वाढू लागली आहे. कर्जबाजारी शेतकरी सावकारांच्या पाशात अडकून एकानंतर एक आत्महत्या करीत आहेत. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा आकडा दीडशेपर्यंत पोहोचला. आत्महत्यांचे सत्र अजूनही थांबलेले नाही. शेतात पीक नाही, खिशात दमडी नाही, अशा परिस्थितीत जगायचे कसे असा प्रश्न गरीब शेतकऱ्यांना भेडसावत आहे. मराठवाड्यातील तब्बल ८ हजार ५०० हून अधिक गावांची पैसेवारी पन्नास टक्क्यांपेक्षा कमी आहे. दरवर्षी रबी आणि खरीप हंगाम आल्यावर कर्ज काढून शेतकरी पेरणी करीत आहेत. निसर्गाने दगा दिल्यावर शेतकऱ्यांचे अक्षरश: कंबरडेच मोडले जात आहे.मंगळवारी केंद्र शासनाने महाराष्ट्रातील दुष्काळासाठी फक्त ३१०० कोटींचे पॅकेज जाहीर केले. एवढ्या तुटपुंज्या निधीत संपूर्ण महाराष्ट्रात कशी मदत द्यायची हा सर्वात मोठा प्रश्न आहे. एकट्या मराठवाड्याला खरीप हंगामाच्या मदतीसाठी सुमारे ३ हजार कोटींची गरज आहे. केंद्राच्या पॅकेजमध्ये राज्य शासन आपला वाटा म्हणून किती कोटी टाकणार यावर बरेच काही अवलंबून राहणार आहे.केंद्र शासनाला अहवाल सुपूर्दजून महिन्यात पेरणी केलेल्या शेतकऱ्यांच्या हाताला काहीच लागले नाही. जनावरांनाही चारा उरलेला नाही. खरीप हातचे गेले. पावसाने दडी मारल्यामुळे ३९ लाख ५३ हजार ८९८ हेक्टरवर झालेली खरिपाची पेरणी वाया गेल्याची नोंद शासकीय दप्तरी आहे. या भयावह परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मागील महिन्यात केंद्र शासनाचे पथक मराठवाड्याच्या दौऱ्यावर आले होते. पथकाने काही प्रमुख गावांची पाहणी करून केंद्र शासनाला आपला अहवाल सुपूर्द केला.