शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात अवकाळी!

By admin | Updated: June 5, 2016 00:44 IST

मराठवाड्यात बहुतांश भागात शनिवारी वादळी वारे व विजांच्या कडकडाटांसह अवकाळी पाऊस झाला. वीज अंगावर पडून बीड जिल्ह्याच्या माजलगाव तालुक्यात दोन ठार, पाच जखमी तसेच उस्मानाबाद

औरंगाबाद : मराठवाड्यात बहुतांश भागात शनिवारी वादळी वारे व विजांच्या कडकडाटांसह अवकाळी पाऊस झाला. वीज अंगावर पडून बीड जिल्ह्याच्या माजलगाव तालुक्यात दोन ठार, पाच जखमी तसेच उस्मानाबाद, परभणी जिल्ह्यात प्रत्येक एक असे चार जण ठार झाले. वीज कोसळल्याने उस्मानाबाद शहराजवळील एका पोल्टीफॉर्ममधील ५०० कोंबड्या दगावल्या. लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. वादळामुळे जालना जिल्ह्यातील घनसावंगी येथील पेट्रोल पंपाचे छत उडाले. बीड जिल्ह्याच्या माजलगाव तालुक्यातील वांगी येथे वीज पडून गणेश ग्यानबा जाधव (४५) हे जागीच मृत्युमुखी पडले तर अंगद श्रीरंग मोहिते (४०), रतन विठ्ठल जाधव (३५) दोघे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर अंबाजोगाईतील शासकीय रुग्णालयात उपचार चालू आहेत. याच तालुक्यातील गोविंदवाडी येथे वाऱ्याने उडालेल्या पत्र्यामुळे मान कापून बळीराम संपती जाधवर (४५) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यावेळी सिंधू गोपीनाथ मुंडे, विठ्ठल निवृत्ती चाटे, रामचंद्र तिडके हे तिघे जखमी झाले. याशिवाय अंबाजोगाई, धारूर, गेवराई, पाटोदा, आष्टी, शिरूर कासार व परळी या तालुक्यांमध्ये सर्वदूर पावसाचे आगमन झाले.गेवराई तालुक्यातील लुखा मसला येथील शेतकरी वसंत हरकटे यांच्या शेतातील गायीच्या अंगावर वीज पडून ती दगावल्याची घटना घडली.उस्मानाबाद जिल्ह्याच्या बहुतांश भागात सलग दुसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाने हजेरी लावली़ शहरानजीक वैराग रोडवरील पोल्ट्रीफार्मवर वीज पडल्याने इलियास महेबूब शेख (वय-५२) यांचा मृत्यू झाला़ परभणी जिल्ह्यातील धसाडी येथे वीज पडून शोभा तुकाराम शिंदे (वय २७) या महिलेचा मृत्यू झाला़ उदगीर, अहमदपूर, निलंगा चाकूर, औसा, शिरूर अनंतपाळ, देवणी आणि रेणापूर तालुक्यातील बहुतांश भागात पाऊस झाला. या पावसामुळे वळसंगी नदीला पाणी आले असून, ओढे, नाले वाहत आहेत़ (प्रतिनिधी)मुसळधार पाऊस, वादळ आणि वारा- लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. वादळामुळे जालना जिल्ह्यातील घनसावंगी येथील पेट्रोल पंपाचे छत उडाले. या पावसामुळे वळसंगी नदीला पाणी आले असून, ओढे, नाले वाहत आहेत़ जालना शहरासह जिल्ह्यातील अंबड, बदनापूर मंठा आणि घनसावंगी तालुक्यातील काही भागात जोरदार पाऊस झाला आहे.