शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या ७ टीएमसीवर मराठवाड्याची बोळवण

By admin | Updated: October 13, 2016 06:29 IST

कृष्णा मराठवाडा पाटबंधारे प्रकल्पातून मराठवाड्याला २१ टीएमसी पाणी देण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी प्रतिष्ठा पणाला लावली

अतुल कुलकर्णी /मुंबईकृष्णा मराठवाडा पाटबंधारे प्रकल्पातून मराठवाड्याला २१ टीएमसी पाणी देण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती, पण आता २१ टीएमसीऐवजी ७ टीएमसी पाण्यावर मराठवाड्याची बोळवण केली जाणार असून, तसे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना पाठवले आहे. मराठवाड्यातला २१ टीएमसी पाणी देण्याला राष्ट्रवादीचा सुरुवातीपासून विरोध आहे. या विरोधातूनच आघाडी सरकारच्या काळात हा वाद कृष्णा पाणी तंटा लवादाकडे गेला. लवादाने कृष्णेतून भीमात, अर्थात आंतरउपखोऱ्यातून १४ टीएमसी पाणी सोडण्यास मनाई केली. आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. आंतरउपखोरे पाणी देण्याला लवादाचा विरोध असल्याने त्याला न्यायालयात आव्हान देणे, त्यासाठी कायदेशीर लढाई करणे यासाठी मराठवाड्यात कोणतेही आंदोलन उभे राहिलेले नाही.दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्रातून फक्त ७ टीएमसी पाण्यासाठीच्या खर्चाचे तपशील समोर आले आहेत. उजनीचे पाणी मराठवाड्याला द्यायचे झाल्यास, नीरा नदीचे ७ टीएमसी पाणी भीमा नदीत टाकून ते मराठवाड्याला द्यावे लागणार आहे. या योजनेचा सुधारित खर्च ५,५९९ कोटी रुपयांचा आहे. त्यापैकी ४,८१७ कोटी रुपये खर्च करणे अजून शिल्लक आहे. २०१७-१८ ते २०२०-२१ या पुढील ४ वर्षांत हा प्रकल्प कालबद्धरीत्या राबविण्याचे सरकारने ठरवले असून, त्यानुसार हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी दरवर्षी अर्थसंकल्पात दरवर्षी १२०० कोटींची तरतूद करणे आवश्यक आहे. आज दरवर्षी फक्त १०० ते १५० कोटी रुपये या प्रकल्पावर दिले जात आहेत. जर १२०० कोटी रुपये द्यायचे असतील तर हा प्रकल्प राज्यपालांच्या निर्देशातून वगळावा लागेल. तशी परवानगी द्या, असे मुख्यमंत्र्यांनी पत्रात म्हटले आहे.