शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणार तरी कधी ?

By admin | Updated: May 2, 2017 22:29 IST

यंदाच्या महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती.

मयूर देवकर/ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. 2 - यंदाच्या महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र दरवर्षीप्रमाणे यंदाही मराठीजनांच्या पदरी निराशा पडली. महाराष्ट्र दिनाचा मुहूर्त लागोपाठ तिसऱ्यांदा हुकला. त्यामुळे अभिजात भाषेचा दर्जा मिळणार तरी कधी? असा संतप्त सवाल मराठी सारस्वतांकडून विचारला जात आहे.अभिजात दर्जाच्या मुद्द्याची गत आता लांडगा आला रे आलाप्रमाणे झाली असून, दरवर्षी जागतिक मराठी दिन किंवा महाराष्ट्र दिन जवळ येताच सर्वांना याचे वेध लागतात. सर्व पुराव्यांसह अहवाल सादर केल्यानंतरही केवळ राजकीय अनास्था व उदासीनतेमुळे हा मुद्दा गेली चार वर्षे औपचारिकतेच्या सोपस्कारामध्ये अडकला आहे. राज्य शासन गठीत अभिजात मराठी भाषा समितीने तयार केलेल्या अहवालास अकादमीच्या भाषा समितीने एकमताने सकारात्मक लेखी अभिप्राय देऊन २०१५ साली तो केंद्र सरकारकडे वर्ग केला. दर्जा देण्याच्या विरोधात वकील आर. गांधी यांनी मद्रास उच्च न्यायालयात दाखल के लेल्या याचिकेमुळे दोन वर्षांपासून केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी हा निर्णय प्रलंबित होता. गेल्या मार्च महिन्यात मद्रास उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली आणि महाराष्ट्र दिनाचा मुहूर्त साधून केंद्र सरकार दर्जाची घोषणा करेल, अशी आस निर्माण झाली होती.केंद्रात आणि राज्यात एकाच पक्षाचे सरकार असूनही मराठीला दर्जा मिळवण्यास एवढा विलंब होतो म्हटल्यावर पराकोटीची राजकीय अनास्था याखेरीज दुसरे काय म्हणणार, असे निराशायुक्त उद्गार अभिजात मराठी भाषा समितीचे अध्यक्ष प्रा. रंगनाथ पठारे यांनी लोकमतशी बोलताना काढले. संपूर्ण भारतभर मराठी माणसे विखुरलेली आहेत. आपापल्या परीने ही लाखो मंडळी आजही मराठी जिवंत ठेवून आहेत. अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तर भाषा संवर्धनासाठी आर्थिक पाठबळ मिळेलच परंतु या सर्व लोकांना जोडण्यास खूप मदत होईल. तसेच विविध बोलींचे कोश करण्याचे काम पूर्ण होऊ शकेल. मराठी भाषिकांचा आत्मविश्वास वाढेल हे वेगळे सांगायला नको, असे ते म्हणाले.दिल्लीवर मोर्चा काढा!राजकीय यंत्रणेवर दबाव निर्माण करण्यासाठी आता जनसामान्यांनाच पुढाकार घेण्याची गरज आली आहे. साहित्य संस्था, बुद्धिवंत, भाषाप्रेमी आणि माध्यमांनी एकत्र येऊन शासन दरबारी आवाज चढवला तर कदाचित काही फरक पडेल. दिल्लीत जाऊन मोर्चा काढला पाहिजे, असे प्रा. पठारे म्हणाले. एवढे मुहूर्त चुकवले आता बस! उगीच एखाद्या औचित्याची वाट पाहणे सोडा आणि मराठी भाषेला अभिजात दर्जा घोषित करावा. त्यासाठी चांगल्या मुहूर्ताची प्रतीक्षा करण्याची वेळ आता सरून गेली, अशी प्रतिक्रिया कवी दासू वैद्य यांनी व्यक्त केली.छोट्या-मोठ्या गोष्टींसाठी महाराष्ट्राला नेहमीच केंद्राशी झगडावे लागले आहे. आपले शासनकर्तेही यामध्ये कमी पडतात. आता सर्वसामान्य जनतेनेच त्यांना जाब विचारला पाहिजे.- प्रा. रंगनाथ पठारे, ज्येष्ठ साहित्यिकसर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करूनही आमच्या हक्काची मागणी मिळू नये याला काय म्हणायचे? जबरदस्तीने दर्जाची मागणी नाही करीत आहोत. विधायक मार्गानेच पण जलद दर्जा हवा.- दासू वैद्य, कवी