शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
4
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
5
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
6
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
7
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
8
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
9
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
11
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
12
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
13
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
14
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
15
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
16
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
17
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
18
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
19
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
20
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन

मराठी माणूस हद्दपार होतोय!

By admin | Updated: November 23, 2015 02:22 IST

मुंबापुरीतूनच मराठी माणूस हद्दपार होत चालला आहे, अशी खंत व्यक्त करत नव्या पिढीतील साहित्यिकांनीही मुंबईचे बदलते विदारक चित्र साहित्यातून मांडले पाहिजे

डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्य नगरी मुंबापुरीतूनच मराठी माणूस हद्दपार होत चालला आहे, अशी खंत व्यक्त करत नव्या पिढीतील साहित्यिकांनीही मुंबईचे बदलते विदारक चित्र साहित्यातून मांडले पाहिजे, असे मत पानिपतकार विश्वास पाटील यांनी व्यक्त केले.कोकण मराठी साहित्य परिषदेच्या १६ व्या कोकण मराठी साहित्य संमेलनाची सांगता रविवारी झाली, या प्रसंगी विशेष अतिथी म्हणून ते बोलत होते. या वेळेस संमेलनाध्यक्ष जयंत पवार, स्वागताध्यक्ष आमदार अ‍ॅड. आशिष शेलार, ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक, कोमसापचे केंद्रीय अध्यक्ष डॉ.महेश केळुसकर, डॉ.बाळ फोंडके, सारस्वत बँकेचे उपाध्यक्ष गौतम ठाकूर, उपमहापौर अलका केरकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पाटील यांनी हल्ली जगण्यापेक्षा मार्केटिंगला महत्त्व येत आहे, असे म्हणत ‘मेंटेनन्स’नावाचा राक्षस मराठी माणसाला गिळत चालला आहे, अशी खंत व्यक्त केली.१६ व्या कोकण मराठी साहित्य संमेलनात समारोप समारंभाचे प्रास्ताविक करताना ‘कोमसाप’चे केंद्रीय अध्यक्ष डॉ. महेश केळुसकर म्हणाले की, ‘हे संमेलन यशस्वी करण्यासाठी कोमसापच्या कुटुंबाने एकत्रितरीत्या मेहनत केली आहे.’ या संमेलनाचा राज्यातील, देशातील आणि परदेशातील जवळपास ८ लाख ७० हजार साहित्यरसिकांनी आस्वाद घेतल्याची बाबही त्यांनी अधोरेखित केली. या प्रसंगी नाट्यसंमेलनाध्यक्ष गंगाराम गवाणकर यांचा सत्कार करण्यात आला. मालवणीतून सुरुवात : सत्काराला उत्तर देताना गवाणकरांनी अस्सल मालवणीत भाषणाला सुरुवात केली. ते म्हणाले की, ‘कोकणातल्या माणसाची खासियत आहे, खिशात पैसे असो वा नसो, पण सगळे दणक्यात करुन दाखवतात, तसेच हे संमेलनही कोमसापने दणक्यात करुन दाखवले आहे.’