शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

संगणकासाठी मराठी ‘फ्रेंडली’

By admin | Updated: February 6, 2017 05:56 IST

एकविसाव्या शतकात तंत्रज्ञानाने भरारी घेतल्याने भाषेशी निगडीत अनेक नाविन्यपूर्ण प्रयोग करणे आता शक्य झाले आहे. आज मोबाईलमध्ये मराठी फॉण्टचे अ‍ॅप्लिकेशन

नम्रता फडणीस, पुणेएकविसाव्या शतकात तंत्रज्ञानाने भरारी घेतल्याने भाषेशी निगडीत अनेक नाविन्यपूर्ण प्रयोग करणे आता शक्य झाले आहे. आज मोबाईलमध्ये मराठी फॉण्टचे अ‍ॅप्लिकेशन डाऊनलाऊड केले तर एका झटक्यात मराठीत कोणताही शब्द टाईप करता येऊ शकतो. इतकी तंत्रज्ञानाने प्रगती केली आहे. मराठीप्रेमींसाठी ही नक्कीच अभिमानास्पद गोष्ट असली तरी घरच्या संगणकापासून अद्यापही ‘माय मराठी’ काही अंशी दूरच आहे. घरचा संगणकही मराठी ‘फ्रेंडली’ होण्याकरिता राज्य शासनाने माहितीपट निर्मितीच्या दिशेने पावले उचलली आहेत.इंग्रजीच्या बोलबाल्यामध्ये मराठीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. मराठी शाळा बंद पडत आहेत, अशी वारंवार ओरड केली जाते. मराठी ज्ञानव्यवहाराची भाषा नसल्यामुळे तरूणवर्गही मराठीकडे पाठ फिरवित आहेत. या संदर्भात शासनानेच ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याची अपेक्षा भाषाप्रेमी, अभ्यासकांकडून व्यक्त केली जाते. त्यामुळे शासनस्तरावरही विविध प्रकल्पांच्या माध्यमातून मराठी भाषेला जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.येत्या २७ फेब्रुवारीला ‘भाषा दिन’ साजरा होत आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळेल तेव्हा मिळेल, पण ‘मायमराठी’ला ज्ञानव्यवहारासह तंत्रज्ञानाची भाषा म्हणून विकसित करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. ‘जे बोलाल ते टाईप होईल’, अशा पद्धतीचे सॉफ्टवेअर तयार करण्याबरोबरच घरच्या संगणकावर मराठीचे बोल पोहोचविण्यासाठी ‘संगणक आणि मराठी’ या शीर्षकांतर्गत माहितीपट तयार करण्याचा निर्णय शासनस्तरावर घेण्यात आला आहे.(प्रतिनिधी)