शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय अभ्यासक्रमांमध्ये मराठीची सक्ती - शिक्षणमंत्री

By admin | Updated: March 12, 2016 04:21 IST

आयजीसीएसई, आयबी या केंद्रीय अभ्यासक्रमांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत मराठी भाषा शिकविणे बंधनकारक करण्यात आले आहे, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज विधानसभेत सांगितले.

मुंबई : आयजीसीएसई, आयबी या केंद्रीय अभ्यासक्रमांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत मराठी भाषा शिकविणे बंधनकारक करण्यात आले आहे, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज विधानसभेत सांगितले. केंद्रीय अभ्यासक्रमाच्या शाळांना राज्याच्या शिक्षण विभागातर्फे दर तीन वर्षांनी ना हरकत प्रमाणपत्र देताना त्यांच्या पहिली ते सातवीपर्यंतच्या अभ्यासक्रमामध्ये मराठी भाषा विषयाचे बंधन घालूनच असे प्रमाणपत्र दिले जात आहे, असे तावडे यांनी स्पष्ट केले. या शाळांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अभ्यासक्रमात समाविष्ट करावा, असा राज्य विधिमंडळाचा ठराव केंद्र सरकारकडे लवकरच पाठविण्यात येईल, असे तावडे म्हणाले. पूर्व प्राथमिक शाळांवर (नर्सरी) शिक्षण विभागाचे नियंत्रण नसते. त्यामुळे त्यांच्या फीवरही अंकुश लावता येत नाही, अशी कबुली त्यांनी दिली. या शाळा शिक्षण विभागाच्या अखत्यारीत आणण्याची मागणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, ज्येष्ठ सदस्य गणपतराव देशमुख आदींनी केली. वर्षा गायकवाड, देवयानी फरांदे, राधाकृष्ण विखे-पाटील यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. पूर्व प्राथमिक शाळा शिक्षण विभागाच्या अखत्यारीत घेण्याबाबत विचार केला जाईल. त्याच्या आर्थिक उत्तरदायित्वाचा विचार करूनच निर्णय घ्यावा लागेल, असे तावडे म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)शाळाबाह्य मुले दाखवा हजार रुपये मिळवाराज्यात शाळाबाह्य मुले-मुली दाखवा आणि १ हजार रुपये मिळवा, अशी योजना लवकरच सुरू केली जाईल, असे तावडे यांनी जाहीर केले. यातील ७५० रुपये शिक्षणाधिकारी तर २५० रुपये आपण स्वत:च्या खिशातून देऊ, असे ते म्हणाले. राज्यात ‘लेक शिकवा’ योजनेकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राजेश टोपे, दिलीप वळसे-पाटील यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. कस्तुरबा बालिका विद्यालयांवर संक्रांतशाळाबाह्य मुलींसाठी चालविण्यात येत असलेली कस्तुरबा गांधी बालिका विद्यालये बंद करणार की नाही, याबाबत तावडे यांनी कोणतेही ठोस उत्तर दिले नाही. या मुलींची पर्यायी दर्जेदार शिक्षणाची सोय होत असेल तर विचार करावा लागेल, असे ते म्हणाले. त्यामुळे या विद्यालयांच्या राज्यातील भवितव्याबाबतची अनिश्चितता कायम असल्याचे स्पष्ट झाले.