शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

वडगावशेरीत मराठा मोर्चा नियोजन बैठक

By admin | Updated: September 20, 2016 02:01 IST

द्वारका गार्डन मंगल कार्यालयात रविवारी (दि. १८) आयोजित बैठकीला चंदननगर, खराडी, वडगावशेरीतील मराठा समाजातील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग नोंदविला

चंदननगर : पुणे शहरात येत्या रविवारी (दि. २५) आयोजिण्यात आलेल्या मराठा क्रांती मूक मोर्चाच्या पूर्वतयारीसाठी वडगावशेरीतील द्वारका गार्डन मंगल कार्यालयात रविवारी (दि. १८) आयोजित बैठकीला चंदननगर, खराडी, वडगावशेरीतील मराठा समाजातील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.याप्रसंगी हेमंत बत्ते, अण्णा भापकर, रवींद्र गायकवाड, कैलास सोनवणे, आबा पऱ्हाड, अप्पा उकीरडे, संजय शिवले, श्रीरंग लंघे, राहुल पठारे, यशवंतराव चव्हाण, बापू वसंत पठारे, सचिन पठारे, विनोद गलांडे, श्रीधर गलांडे, दिलीप देवकर, नवनाथ पठारे, बापू पठारे, महेंद्र पठारे, महादेव पठारे, राजेंद्र पठारे, सचिन सातपुते, दत्ता ढेरंगे, राजाभाऊ चौधरी, अनिल जावळकर, सुरेश शेजवळ, विजय गलांडे, नारायण गलांडे, विशाल साळी, आदिनाथ गलांडे, कमलेश गलांडे, बंडू गायकवाड, रमेश आढाव, संजय चांधारे, अमित सातकर, कल्पेश यादव, प्रमोद देवकर, अमृता पठारे, सुनील भगत, आशा जगताप, शिवा वडगुले, संतोष दरेकर, पवन सातव, रवींद्र पठारे, सुनील पठारे, फिरोज मणियार, गुलाब गायकवाड, कैलास पठारे उपस्थित होते.या वेळी अनेकांनी आपले मत नोंदवले व मोर्चा आणि आंदोलनाविषयी सूचना केल्या. विशेष म्हणजे या बैठकीसाठी कुणालाही वैयक्तिक निमंत्रण न देता, केवळ सोशल मीडियावरून माहिती देण्यात आली होती. तरीही नागरिकांनी बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. बंडू गायकवाड यांनी प्रास्ताविकात मराठा मूक मोर्चा कुठल्याही समाजाविरोधात नसून, मराठ्यांच्या विविध मागण्यांसाठी आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांत झालेल्या मोर्चांचा आदर्श सर्वांनी घ्यावा, मोर्चाला कसल्याही प्रकारचे गालबोट लागू नये, याची काळजी घ्यावी, सोशल मीडियावर वादग्रस्त विधाने टाकू नयेत, वादग्रस्त विधानांना प्रतिउत्तर न देता ते काढून टाकावे, तसेच कुणालाही पुढे पाठवू नये, मोर्चाच्या दिवशी जाताना हुल्लडबाजी करू नये, मद्यपान, धूम्रपान करू नये, कचरा रस्त्यात टाकू नये, कोणत्याही घोषणा देऊ नये हा मूक मोर्चा असून शांततेतच मोर्चात सहभाग घ्यावा, अशा प्रकारच्या सूचना यांनी मोर्चाच्या नियोजनाची माहिती देऊन शिस्तबद्ध पद्धतीने मोर्चात मराठा महासंघाचे गुलाब गायकवाड यांनी सहभागी होण्याचे आवाहन केले. आबा पऱ्हाड यांनी सूत्रसंचालन केले. जे पुण्यात पिकतं ... ते संपूर्ण देशात विकतं... त्यामुळे पुण्याची बदनामी नको, असे आवाहन या वेळी केले. (वार्ताहर)>कर्कश आवाजाच्या वाहनांवर त्वरित कारवाईउपनगरातील युवकांनी व नागरिकांनी मोर्चाला जाताना दुचाकी किंवा बुलेटच्या धुराच्या नळीतून फटाक्यासारख्या कर्कश आवाज काढू नये. ज्या वाहनांचा आवाज कर्कश असेल, अशा वाहनांवर स्वयंसेवक वाहने पोलिसांच्या ताब्यात देणार आहे. कुणीही कुठल्याही प्रकारचे शक्तीप्रदर्शन करू नये. ग्रामिण भागातील नागरिकांच्या वाहनांना प्रथम स्थान द्यावे. सर्वांनी प्रत्येकाचे वाहन मोर्चाच्या दिवशी बाहेर न काढता बसने प्रवास करावा. आपल्यापासून कोणालाही कसलाही त्रास होऊ नये, याची काळजी घ्यावी, असे आवाहन या वेळी केले. मोर्चाला कसल्याही प्रकारचे गालबोट लागता कामा नये, अशा सूचना संयोजकांनी उपस्थितांना दिल्या.