शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

भ्रूृणहत्या प्रकरणामध्ये अनेक प्रथितयश डॉक्टर

By admin | Updated: March 8, 2017 00:41 IST

म्हैसाळा (ता.मिरज, जि.सांगली) येथील भ्रूण हत्या प्रकरणात कोल्हापूर, मिरज, सांगलीतील काही प्रथितयश डॉक्टर सामील असल्याची धक्कादायक माहिती सार्वजनिक

मुंबई : म्हैसाळा (ता.मिरज, जि.सांगली) येथील भ्रूण हत्या प्रकरणात कोल्हापूर, मिरज, सांगलीतील काही प्रथितयश डॉक्टर सामील असल्याची धक्कादायक माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी आज विधानसभेत दिली. विधानसभेचे कामकाज बाजूला ठेऊन या भ्रूण हत्येवर चर्चा घ्यावी, असा स्थगन प्रस्ताव विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला होता. हा विषय स्थगन प्रस्तावाच्या निकषात बसत नाही, असे सांगून अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी विखे पाटील आणि काही सदस्यांना बोलण्याची अनुमती दिली. सरकारने या विषयावर निवेदन करावे, असे निर्देशही दिले. या प्रकरणातील सर्व आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, हीच सरकारची भूमिका असेल, असे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. कोणालाही पाठीशी घालणार नाही, असे आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत म्हणाले. सरकारतर्फे सायंकाळपर्यंत सभागृहात निवेदन करण्याची मागणी विरोधकांनी केली. ‘आपण स्वत: म्हैसाळाला उद्या भेट देऊन गुरुवारी सभागृहात निवेदन करू, असे डॉ.सावंत यांनी सांगितले. तथापि, आज सरकारकडे कुठली माहिती आहे? ती सांगा, असा आग्रह ज्येष्ठ सदस्य दिलिप वळसे पाटील यांनी धरला. त्यावर डॉ.सावंत यांनी सांगितले की, या प्रकरणात सातारा, सांगली, कोल्हापुरातील प्रथितयश रेडिआॅलॉजिस्ट, गायनाकॉलॉजिस्ट, अ‍ॅनॅस्थेसिस्ट सहभागी आहेत. कर्नाटकमध्ये सोनोग्राफी करून गर्भपातासाठी महिलांना म्हैसाळामध्ये आणले जात होते. ज्यांना पूर्वी एक किंवा दोन मुली आहेत आणि पुन्हा गर्भात मुलगीच असलेल्यांचा मुख्यत्वे गर्भपात केला जायचा. अधिक चौकशी केली जात आहे. मुख्य आरोपी डॉ.बाबासाहेब खिद्रापुरेला अटक करण्यात आली आहे, असे डॉ.सावंत यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)तो क्रूरकर्मा अखेर शरणम्हैसाळ येथे बेकायदा गर्भपात केंद्र चालवून भ्रूणहत्या करणारा व चार दिवसांपासून गुंगारा देत फरारी असलेला बाबासाहेब अण्णाप्पा खिद्रापुरे (४२), हा सोमवारी रात्री उशिरा मिरज ग्रामीण पोलिसांना शरण आला. न्यायालयाने त्याला दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याने म्हैसाळमध्ये एका शेतात लपविलेले क्ष-किरण यंत्रही पोलिसांनी मंगळवारी जप्त केले. मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणीराज्यात घडलेल्या या गंभीर घटनेची जबाबदारी स्वीकारुन गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत, महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षांनी केली.