शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांच्या अनेक कुंडल्या माझ्या हातात - मुख्यमंत्री

By admin | Updated: October 6, 2016 05:14 IST

विरोधकांचे नाक दाबण्यासाठी अनेक कुंडल्या माझ्या हातात आहेत. विरोधकांसाठी अनेक अस्त्र सांभाळून ठेवली आहेत. कुठले अस्त्र कधी वापरायचे हे मी ठरवेन.

मुंबई : विरोधकांचे नाक दाबण्यासाठी अनेक कुंडल्या माझ्या हातात आहेत. विरोधकांसाठी अनेक अस्त्र सांभाळून ठेवली आहेत. कुठले अस्त्र कधी वापरायचे हे मी ठरवेन. तुम्ही न डगमगता स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीला सामोरे जा, आक्रमक राहा, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना इशारा देत भाजपा पदाधिकाऱ्यांना स्थानिक निवडणुकांच्या तयारीला लागण्याचा संदेश दिला. दादर येथील भाजपा कार्यालयात बुधवारी प्रदेश कार्यकारणीच्या दोन दिवसीय बैठकीला सुरुवात झाली. एकीकडे मराठा आरक्षणावरून वातावरण तापत असतानाच स्थानिक स्वराज संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. विरोधकांनी पद्धतशीरपणे सरकारची कोंडी करण्याचे प्रयत्न चालविल्याची भावना भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठकीच्या पहिल्याच दिवशी मराठा आरक्षणावरून पदाधिकाऱ्यांना आश्वस्त करतानाच विरोधकांना थेट इशारा दिला. राज्यात आपण मुख्य पक्षाच्या भूमिकेत आल्यामुळे सर्व पक्ष आपल्या विरोधात आले आहेत. विरोधकांना न डगमगता आक्रमकपणे आपण केलले काम जनतेसमोर मांडा. विरोधकांसाठी अनेक अस्त्र माझ्या हातात आहेत. कुठले अस्त्र कधी वापरायचे हे मी ठरवेन तुम्ही विरोधकांची चिंता करू नका, या शब्दात मुख्यमंत्र्यांनी पदाधिकाऱ्यांना आश्वस्त केल्याची माहिती बैठकीत उपस्थित असणाऱ्या सूत्रांनी दिली. जे ५०-५५ वर्षे सत्तेत होते तेच आज छाती पुढे काढून मराठा समाज मागे का, असा प्रश्न करत आहेत. इतकी वर्षे राज्य करून ७५ टक्के समाज मागे का, याचे उत्तर त्यांनी द्यायला हवे. लाखोंच्या संख्येने निघणारा मराठा समाजाचा मोर्चा प्रस्थापितांच्या विरोधात वंचितांचा मोर्चा आहे. तो भाजपा विरोधात नाही. मराठा आरक्षणाबाबत आमची भूमिका संवेदनशीलतेची आहे. आरक्षण देण्याची आहे. घटनेच्या चौकटीत राहून मराठा समाजाला शिक्षणात आणि नोकरीत आरक्षण देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. तर, मराठा आरक्षणाला भाजपाचा पाठिंबा असून तसा ठराव गुरुवारी कार्यकारिणीच्या बैठकीत संमत करण्यात येणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)