शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

मनोरुग्ण मुलीचा पित्यावर बलात्काराचा खोटा आरोप

By admin | Updated: June 3, 2017 03:16 IST

वडील फक्त लहान भावावर प्रेम करतात, आपले लाडच करत नाहीत, अशा समजुतीतून एका १३ वर्षांच्या मनोरुग्ण मुलीने पित्यावरच

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : वडील फक्त लहान भावावर प्रेम करतात, आपले लाडच करत नाहीत, अशा समजुतीतून एका १३ वर्षांच्या मनोरुग्ण मुलीने पित्यावरच लैंगिक अत्याचाराचा खोटा आरोप केल्याची धक्कादायक घटना ओशिवरा येथे घडली. पॉक्सो आणि लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात वडिलांना अटक केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.जोगेश्वरीत १३ वर्षांची नेहा (नावात बदल) चहाची टपरी चालविणारे वडील, आई आणि दोन भावंडासह राहते. दोन दिवसांपूर्वी नेहा अचानक घरातून गायब झाली. बराच शोध घेऊनही न सापडल्याने, वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर, सांताक्रुझ येथील चौपाटीवर ती वडिलांना सापडली. मुलगी सापडल्याची माहिती देण्यासाठी ते मुलीला पोलीस ठाण्यात घेऊन गेले. पोलिसांनी नेहाची विचारपूस केली असता, तिने वडिलांनी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्यामुळे घर सोडून निघून गेल्याचे सांगितले. नेहाच्या तक्रारीवरून पोलिसांनी वडिलांविरुद्ध पॉक्सो आणि लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आणि तिला वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले. तपासणीनंतर पोलिसांनी तिचा जबाब नोंदविण्यास सुरुवात केली. तेव्हा पोलीसही चक्रावले. ‘बाबा माझ्या लहान भावाचे लाड करतात, माझे करतच नाहीत, म्हणून रागाने मी हा आरोप केला,’ असे तिने पोलिसांना सांगितले. तक्रारदार मुलगी आणि तिची आई मनोरुग्ण असून वडील दोघांचाही सांभाळ करतात. यापूर्वीही दोन ते तिनदा मुलगी घरातून निघून गेली होती. तेव्हाही पोलिसांनी तिला सांताक्रुझ चौपाटीवरून शोधून आणले होते. मी घरी परतत असताना, दोन मुलांनी मला अडविले आणि माझ्यावर अत्याचार केला, असा आरोप तिने तेव्हाही केला होता. मात्र वैद्यकीय चाचणीत असा काहीच प्रकार घडला नसल्याचे उघडकीस आले होते. सध्या तिला डोंगरी सुधारगृहात पाठविण्यात आले असून तिचे समुपदेशन करण्यात येणार आहे, अशी माहिती ओशिवराचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष खानविलकर यांनी दिली. दरम्यान, याप्रकरणी न्यायालयाने तिच्या वडिलांना ६ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.