शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

मनोज म्हात्रे हत्येप्रकरणी चुलत भावाविरोधात गुन्हा

By admin | Updated: February 15, 2017 13:29 IST

काँग्रेसचे नगरसेवक मनोज म्हात्रे यांच्या हत्येप्रकरणी त्यांचा चुलत भाऊ प्रशांत म्हात्रेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ऑनलाइन लोकमत

भिवंडी, दि. 15 - काँग्रेसचे नगरसेवक मनोज म्हात्रे यांच्या हत्येप्रकरणी त्यांचा चुलत भाऊ प्रशांत म्हात्रेसहीत 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजकीय वैमनस्यातून हत्या झाल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. नारपोली पोलिसांनी ही कारवाई केली आहे. आरोपींना लवकरच अटक करणार, अशी ग्वाही पोलीस उपायुक्ती मनोज पाटील यांनी दिली आहे. 
 
भिवंडीत महानगरपालिकेतील नगरसेवक व काँग्रेसचे गटनेते मनोज म्हात्रे (५३) यांची मंगळवारी रात्री गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली. रात्री साडेनऊच्या सुमारास येथील ओसवालवाडीमागे, कामतघर येथे त्यांच्यावर चार अज्ञातांनी हल्ला केला.
 
रामनगर येथील समर्थक उमाशंकर ऊर्फ मुलायम यादव यांना विरोधकांनी धमकावल्याने त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करावी यासाठी मनोज म्हात्रे नारपोली पोलीस ठाण्यात गेले होते. तेथून ते ओसवालवाडी येथील राहत्या घरी आले असता दबा धरून बसलेल्या सात ते आठ जणांच्या टोळक्याने कोयत्याने हातावर केले व त्यांच्या छातीवर तीन गोळ्या झाडल्या. 
 
यातील दोन गोळ्या वर्मी लागल्याने ते जागीच कोसळले. त्यांना तातडीने ठाण्याच्या खासगी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.  मनोज म्हात्रे हे 2002 पासून नगरसेवक असून त्यांनी दोनवेळा स्थायी समितीचे सभापतीपद भूषवले आहे. ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचे निकटवर्ती म्हणून ते ओळखले जात.