शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या विधानसभा निवडणुकीतील मानधनाला ‘मुहूर्त’

By admin | Updated: March 23, 2017 02:36 IST

अडीच वर्षापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत पोलिसांनी केलेल्या कामाचा मोबदला देण्यासाठी सरकारला अखेर ‘मुहूर्त’ मिळाला आहे.

मुंबई : अडीच वर्षापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत पोलिसांनी केलेल्या कामाचा मोबदला देण्यासाठी सरकारला अखेर ‘मुहूर्त’ मिळाला आहे. त्यासाठी निश्चित केलेले पारिश्रमिक / मानधन देण्याला गृह विभागाने हिरवा कंदील दाखविला आहे. आॅक्टोबर २०१४ मध्ये झालेल्या या निवडणुकीत राज्य पोलीस दलातील सात हजार अधिकारी/ कर्मचारी कार्यरत होते. त्यांना एकूण १० कोटी, ६१ लाख १७ हजार ६४५ रुपये मानधन मिळणार आहे. अडीच वर्षापासून पोलीस अधिकारी/ कर्मचारी या मोबदल्याच्या प्रतीक्षेत होते. राज्यातील २८७ विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीची पूर्ण प्रक्रिया शांतता व सुरळीतपणे पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मतदारसंघनिहाय अन्य विभागाबरोबरच पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांचीही नियुक्ती केली होती. अन्य अधिकाऱ्यांप्रमाणेच पोलिसांनाही या कामाचा विशेष मेहनताना देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार संबंधित घटकप्रमुखांकडून त्यांनी निवडणूक कार्यालयात प्रत्यक्ष/ अपत्यक्षपणे केलेले कामाचे दिवसांचा तपशील निवडणूक अधिकाऱ्यांच्या शिफारशीनुसार पाठवून देण्यात आला होता. त्यासाठी एक महिन्याहून अधिक दिवस काम केलेल्या अधिकारी/ कर्मचाऱ्यांना त्यांच्या श्रेणीप्रमाणे मूळ वेतन व ग्रेड वेतन तसेच ३० दिवसाहून कमी काम केलेल्यांना तितक्या दिवसांचा मानधनाची रक्कम निश्चित करण्यात आली होती. त्याबाबतचा प्रस्ताव पोलीस महासंचालकामार्फत गृह विभागात पाठविण्यात आला होता. अखेर गृह विभागाने या रक्कमेला मंजुरी दिली आहे. राज्य पोलीस दलातील ६,९५५ अधिकारी व अंमलदार कार्यरत होते. त्याचे एकुण मानधन १० कोटी ६१ लाख १७ हजार ६४५ रुपये इतके होते. (प्रतिनिधी)