शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

सहसंचालकांकडून ‘माळेगाव’ची चौकशी

By admin | Updated: September 5, 2016 01:38 IST

प्रादेशिक सहसंचालकांकडून माळेगाव कारखान्याच्या चौकशी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.

बारामती : प्रादेशिक सहसंचालकांकडून माळेगाव कारखान्याच्या चौकशी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. साखर आयुक्त कार्यालयात थकबाकी प्रकरणावरून शासनस्तरावरून तक्रारींची शहानिशा करण्यात येत आहे. त्यानुसार प्रादेशिक सहसंचालकांनी माळेगाव कारखान्याच्या प्रशासनाची चौकशी केली. प्रादेशिक सहसंचालक शशिकांत घोरपडे, विशेष लेखा परीक्षक अनिल सोनवणे यांनी तक्रार प्रकरणातील कागदपत्रे कार्यकारी संचालक विजय वाबळे यांच्यामार्फत तपासली. माळेगाव कारखान्याच्या काही संचालकांनी बिनव्याजी अनामत रकमा वापरणे, उधारीवर घेतलेली खते व दिवाळी अ‍ॅडव्हान्स मुदतीत परत न करणे, गणपूर्ती नसतानाही साखर विक्री करणे, गॅस एजन्सीद्वारे झालेला कारखान्याशी व्यवहार आदी विषयांचा तक्रारींमध्ये समावेश होता. याशिवाय विठ्ठल देवकाते यांच्यासह तक्रारकर्त्यांचीही भूमिका या वेळी घोरपडे यांनी ऐकली. या चौकशीच्या पार्श्वभूमीवर माळेगाव कारखान्यावर सत्ताधारी व विरोधक बसून होते. यामध्ये कारखान्याचे अध्यक्ष रंजन तावरे, ज्येष्ठ संचालक चंद्रराव तावरे, शशिकांत कोकरे, सुरेश खलाटे,जवाहर इंगुले, अ‍ॅड. तानाजी पोंदकुले, सुनील सातव, जनार्धन झांबरे, लक्ष्मण जगताप, कामगार संचालक संदेश गावडे, विरोधी गटाचे उपाध्यक्ष रामदास आटोळे, बाळासाहेब गवारे, रामभाऊ देवकाते, राजेंद्र बुरूंगले आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)