शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ शिक्षकांना कायम करा!

By admin | Updated: May 14, 2014 04:42 IST

महाराष्ट्रातील १८ हजार ६४५ अर्धवेळ, कला, क्रीडा, आरोग्य व कार्यशिक्षण निर्देशकांची मंजूर पदे पुढील शैक्षणिक सत्र सुरू होण्यापूर्वी भरावीत -मुंबई उच्च न्यायालय

औरंगाबाद : महाराष्ट्र राज्यातील १८ हजार ६४५ अर्धवेळ, कला, क्रीडा, आरोग्य व कार्यशिक्षण निर्देशकांची मंजूर पदे पुढील शैक्षणिक सत्र (२०१४-२०१५) सुरू होण्यापूर्वी भरावीत, असा महत्त्वाचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. २०१३-२०१४ या वर्षात सर्वच अर्धवेळ निर्देशकांच्या नियुक्त्या खंडित केल्या गेल्याबद्दल बालाजी किसन आडे व अन्य १२६ अंशकालीन निर्देशकांनी याचिका दाखल केली होती. त्यावर न्या. एस.एस. शिंदे व न्या. व्ही.के. जाधव यांनी वरील आदेश दिला. केंद्र शासनाने मूलभूत अधिकारात २००९ मध्ये ६ ते १४ वयोगटातील बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम (कायदा) संमत केला. त्यानुसार मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण पूर्ण करण्याची जबाबदारी शासनाने स्वीकारली. त्यानुसार विद्यार्थी-शिक्षक प्रमाण राखणे आवश्यक झाले. दिनांक ७ डिसेंबर २०११ रोजी ८,५७७ पदे व शैक्षणिक वर्ष २०१२-२०१३ मध्ये १,०६८ पदांना मंजुरी देण्यात आली; परंतु सदरील अंशकालीन मंजूर पदांवर निर्देशकांच्या नियुक्त्या तासिका तत्त्वावर व त्या त्या वर्षापुरत्याच करण्यात आल्या होत्या. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या (मुंबई) पत्रानुसार अंशकालीन निर्देशकांची तात्पुरत्या स्वरूपात तासिका तत्त्वावरील शाळा व्यवस्थापन समितीमार्फत केली गेलेली नियुक्ती व कार्यवाही रद्द करण्यात आली. महाराष्ट्र शासनाने कायदा लागू झाल्यापासून ३ वर्षांत अर्धवेळ निर्देशकांच्या नियुक्त्यांबाबत नियम करणे आवश्यक होते. त्यांच्यासाठी कायमस्वरूपी संवर्गाची स्थापना करून वेतन भत्ते व अन्य सवलती ठरविणे आवश्यक होते. उच्च न्यायालयाने महाराष्ट्र शासन मूलभूत हक्कांची पायमल्ली करीत असल्याबद्दल गंभीर आक्षेप घेतला. याचिकाकर्ते, शासन व शिक्षण परिषद व शिक्षण संचालकांची (प्राथमिक) शपथपत्रे व घटना २००९ च्या कायद्यातील तरतुदी यांचा विचार करून खंडपीठाने वरील आदेश दिले. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. सतीश तळेकर, शासनातर्फे सरकारी अभियोक्ता एस.एस. टोपे व वेगवेगळ्या जिल्हा परिषदांतर्फे अ‍ॅड. (श्रीमती) वाय.एम. क्षीरसागर, अ‍ॅड. ए.डी. आघाव, अ‍ॅड. बी.एम. लोमटे यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)