शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

...तर मेक इन इंडिया फेल ठरेल

By admin | Updated: February 11, 2016 02:16 IST

सरकारने २ लाख किंवा त्याहून अधिक सोने खरेदीवर लादलेली पॅन कार्ड सक्ती मागे घेतली नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुकारलेला ‘मेक इन इंडिया’ प्रकल्प यशस्वी होणार नाही, असा

मुंबई : सरकारने २ लाख किंवा त्याहून अधिक सोने खरेदीवर लादलेली पॅन कार्ड सक्ती मागे घेतली नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुकारलेला ‘मेक इन इंडिया’ प्रकल्प यशस्वी होणार नाही, असा इशारा आॅल इंडिया जेम्स अ‍ॅण्ड ज्वेलरी ट्रेड फेडरेशनने दिला आहे. पॅन कार्ड सक्तीविरोधात फेडरेशनने बुधवारी एक दिवसाचा संप पुकारला होता. त्याला राज्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला.संपाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत फेडरेशनने पुन्हा एकदा सरकारकडे चर्चेची मागणी केली. फेडरेशनचे संचालक अशोक मिनावाला म्हणाले की, केवळ २ लाख रुपयांसाठी पॅन कार्ड सक्ती करणाऱ्या सरकारने खरेदी मर्यादा वाढवून १० लाख रुपये करावी; टप्प्याटप्प्याने पॅन कार्डधारकांचे प्रमाण वाढवल्यानंतर खरेदी मर्यादेत कपात करावी. केवळ २२ कोटी ३० लाख लोकांजवळ पॅन कार्ड आहे. अशा परिस्थितीत केवळ २ लाख रुपयांहून अधिक किमतीच्या सोने खरेदीवर पॅन कार्ड सक्ती लादल्यास सराफा उद्योग उद्ध्वस्त होईल. पॅन कार्ड सक्तीचा फटका देशातील ३ लाख सराफांसोबतच १ कोटी कारागिरांना बसण्याचा दावा फेडरेशनने केला आहे. सराफा उद्योगातील ७० टक्के ग्राहक हे ग्रामीण भागातील आहेत. त्यामुळे पॅन कार्ड सक्ती केल्यामुळे हा ग्राहकवर्ग सराफा बाजारापासून दुरावू लागल्याची भीती फेडरेशनने व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)बंदला संमिश्र प्रतिसादआॅल इंडिया जेम्स अ‍ॅण्ड ज्वेलरी फेडरेशनने पुकारलेल्या संपात देशातील २००हून अधिक संघटनांनी सामील होण्याचा निर्णय घेतला होता. मात्र इंडिया बुलियन अ‍ॅण्ड ज्वेलर्स असोसिएशनने या संपात सामील न होण्याचा निर्णय घेतला होता. याउलट महाराष्ट्र सराफ सुवर्णकार महामंडळाने संपाला पाठिंबा देत दुकाने बंद ठेवली. त्यामुळे काही ठिकाणे दुकाने बंद, तर काही ठिकाणी उघडी असल्याचे निदर्शनास आले.