शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
2
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
3
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
4
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
5
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
6
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
7
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
8
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
9
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
10
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
11
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
12
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
13
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
14
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
15
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
16
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
17
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
18
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
19
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
20
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
Daily Top 2Weekly Top 5

जीपीएस नियंत्रणाचा एकत्रित कक्ष करा

By admin | Updated: April 23, 2015 05:33 IST

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी खाजगी टॅक्सी कंपन्यांना जीपीएस यंत्रणेवर भर देण्याबरोबरच त्याचे एकत्रित नियंत्रण कक्ष

मुंबई : प्रवाशांच्या सुरक्षेसाठी खाजगी टॅक्सी कंपन्यांना जीपीएस यंत्रणेवर भर देण्याबरोबरच त्याचे एकत्रित नियंत्रण कक्ष सुरू करण्याची सूचना परिवहन आयुक्त महेश झगडे यांनी खासगी टॅक्सी कंपन्यांच्या आॅपरेटर्सना दिले आहेत. बुधवारी यासंदर्भात झालेल्या बैठकीनंतर पुढील निर्णय सोमवारपर्यंत ढकलण्यात आला आहे. नवी दिल्लीत उबेर टॅक्सीत एका तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना काही महिन्यांपूर्वी घडली आणि त्यानंतर महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला. महिला प्रवाशांबरोबरच सर्वच प्रवाशांच्या सुरक्षेचा मद्दा पुढे नेत राज्य परिवहन विभागाने त्यावर लक्ष केंद्रित केले आणि खासगी टॅक्सी कंपन्यांसोबत बैठक घेऊन सुरक्षेसंदर्भात ठोस उपाययोजना करण्यासंदर्भात काही सूचनाही केल्या. महत्त्वाची बाब म्हणजे खासगी टॅक्सींमध्ये जीपीएस यंत्रणा बसविण्यापासून त्याचे नियंत्रण कक्ष असावे, यावर परिवहन विभागाकडून भर देण्यात आला. सध्या बड्या टॅक्सी कंपन्यांनी जीपीएस यंत्रणा टॅक्सींमध्ये बसविली असली तरी काही कंपन्या अजूनही यामध्ये मागे आहेत. स्वत:च्या मालकीच्या गाड्या न घेता त्या भाड्याने घेणे आणि चालकही भाडेतत्त्वावर ठेवण्याचे काम या कंपन्यांकडून केले जाते. अशा खासगी कंपन्यांच्या टॅक्सींमध्ये मोबाइल अ‍ॅप्सवरून जीपीएस यंत्रणा हाताळली जाते. या टॅक्सींमध्ये जीपीएस यंत्रणा स्वतंत्रपणे बसविली नसल्याने प्रवाशांनाही मोबाइल अ‍ॅपवरच अवलंबून राहावे लागते. त्यामुळे ही यंत्रणा प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य नसल्याने स्वतंत्र यंत्रणा खासगी टॅक्सींमध्ये असावी आणि या सर्व टॅक्सी कंपन्यांचे एकत्रित नियंत्रण कक्ष असावे, अशी भूमिका परिवहन विभागाने घेतली असून, तशा सूचना बुधवारी खासगी टॅक्सी कंपन्यांसोबत झालेल्या बैठकीत केल्या आहेत. (प्रतिनिधी)