शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात पुन्हा येणार महिलाराज

By admin | Updated: February 4, 2017 18:06 IST

मुंबईमध्ये शुक्रवारी ११ महापालिकांच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली, त्यामध्ये पुणे महापालिकाचे महापौरपद सर्वसाधारण महिला गटासाठी आरक्षित झाले आहे.

पुणे : मुंबईमध्ये शुक्रवारी ११  महापालिकांच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली, त्यामध्ये पुणे महापालिकाचे महापौरपद सर्वसाधारण महिला गटासाठी आरक्षित झाले आहे. त्यामुळे अडीच वर्षांनी पुन्हा महिलेच्या गळ्यात पुण्याच्या महापौर पदाची माळ पडणार असल्याचे निश्चित झाले आहे.
आगामी महापालिका निवडणुकीमध्ये सत्ता मिळविण्यासाठी राष्टÑवादी काँग्रेस व भाजपामध्ये मोठी चुरस निर्माण झाली आहे. महिलेसाठी महापौर पद आरक्षित झाल्याची बातमी कळताच महिला उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. मुंबईमध्ये मंत्रालयातील सभागृहात ११ महापालिकांच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली.
प्रभागांची रचना जाहीर केल्याबरोबरच महापौर पदाची आरक्षणे जाहीर केली जातात. यंदा आॅक्टोबर २०१५ मध्ये प्रभागांची रचना जाहीर करण्यात आली, मात्र महापौर पदाची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली नव्हती. महापालिकेच्या आरक्षणाची सोडत कधी निघणार, याची इच्छुकांकडून सातत्याने निवडणूक अधिकाºयांकडे विचारणा केली जात होतीे. अखेर शुक्रवारी महापौर पद कुठल्या प्रवर्गासाठी राखीव असणार याचा सस्पेन्स संपला.
ज्या प्रवर्गासाठी महापौर पद आरक्षित होईल, त्या प्रवर्गातून निवडणूक लढविणाºया उमेदवारांकडे भावी महापौर म्हणून पाहिले जाते. त्यामुळे यापूर्वी महापौर पदाचे गाजर दाखवून अनेक पक्षांतरेही घडवून आणली जात होती. मात्र, यंदा अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आरक्षण निश्चित होणार असल्यामुळे याचा वापर राजकीय पक्षांना करता आलेला नाही. (प्रतिनिधी)