शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

एका मताने येणार महिलाराज

By admin | Updated: October 8, 2016 04:22 IST

पुढील वर्षी होणाऱ्या ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता १३१ प्रभागांची आरक्षण सोडत शुक्रवारी काढण्यात आली.

ठाणे : पुढील वर्षी होणाऱ्या ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता १३१ प्रभागांची आरक्षण सोडत शुक्रवारी काढण्यात आली. त्यामध्ये नगरसेविकांची संख्या नगरसेवकांच्या तुलनेत एकाने जास्त म्हणजे ६६ नगरसेविका तर ६५ नगरसेवक अशी असणार आहे. त्यामुळे नव्या महापालिका सभागृहात एका मताने ‘महिलाराज’ येणार आहे.मागील निवडणुकीच्या तुलनेत अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या जागा ४ ने वाढल्या असून ओबीसींच्या आरक्षणातही एकाने भर पडली आहे. खुल्या प्रवर्गातून ८४ नगरसेवक पालिकेवर निवडून जाणार आहेत. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल, अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण, अशोक रणखांब, निवडणूक निर्णय अधिकारी ओमप्रकाश दिवटे आदींच्या उपस्थितीत शाळकरी मुलांच्या हातून ही सोडत काढण्यात आली. नव्या प्रभाग रचनेनुसार ३३ बहुसदस्यीय प्रभाग झाले असून अ, ब, क, ड असे मिळून चारचा एक प्रभाग तयार झाला आहे. या बहुसदस्यीय प्रभागातून तब्बल १३१ नगरसेवक पालिकेवर निवडून जाणार आहेत. लोकसंख्या वाढीचे नवे विक्रम प्रस्थापित करणाऱ्या दिवा परिसरातून यंदा तीन पॅनलमधून तब्बल ११ नगरसेवक निवडून जाणार आहेत. शिवसेना आणि भाजपचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या जुन्या ठाण्यातून २० नगरसेवक पालिकेवर निवडून जाणार आहेत. नव्या प्रभाग रचनेनुसार कळवा, मुंब्रा, दिवा परिसरातील जागा वाढल्या असून जुन्या ठाण्यातील जागा कमी झाल्या आहेत. घोडबंदर परिसरातील जागाही काही प्रमाणात वाढल्या आहेत. परंतु कळवा-मुंब्रा परिसरातील राष्ट्रवादीचे वर्चस्व पाहता, या भागातील फेररचना राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडणार असल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)>आरक्षण किती व कसे? पालिकेवर एकूण १३१ नगरेसवक निवडून जाणार असून त्यामध्ये पुरुष ६५ तर स्त्रीया ६६ असतील. अनुसूचित जातीमधील ९ नगरसेवक तर अनुसूचित जमातीमधील नगरसेवक ३ असतील. मागास प्रवर्ग (ओबीसी) नगरसेवकांची संख्या ३५होणार आहे. सर्वसाधारण प्रवर्गातून ८४ नगरसेवक निवडून जाणार आहेत. एकूण ६६ जागा या महिलांसाठी आरक्षित असून यामध्ये अनुसूचित जातीच्या ५, अनुसूचित जमातीच्या २, नागरीकांच्या मागासवर्ग प्रवर्गामधील १८ आणि सर्वसाधारण प्रवर्गातून ४१ महिलांचा समावेश असेल.