शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

'समृद्ध जीवन'चे महेश मोतेवार यांना ३१ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी

By admin | Updated: December 29, 2015 16:24 IST

आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप असलेले समृद्ध जीवनचे महेश मोतेवार यांना ३१ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे. उमरगा न्यायालयात उस्मानाबाद पोलिसांनी त्यांना आज हजर केलं होत.

ऑनलाइन लोकमत
उस्मानाबाद, दि. २९ -  आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप असलेले समृद्ध जीवनचे महेश मोतेवार यांना ३१ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे. उमरगा न्यायालयात उस्मानाबाद पोलिसांनी त्यांना आज हजर केलं होत. काल (सोमवारी) मोतेवार यांना उस्मनाबाद पोलिसांनी पुण्यातून अटक केली होती.  चिटफंड प्रकरणी गुंतवणूकदारांचे पैसे परत न केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
काल पोलिसांनी मोतेवार यांनी अटक केल्यानंतर आज CBI ने महाराष्ट्रासह इतर राज्यातील त्यांच्या कार्यालयावर छापे मारले आणि कागदपत्राची तपासणी केली.  महाराष्ट्रातील पुणे नाशिक, औरंगाबाद आणि सेलापूरमधील कार्यालावर छापे टाकण्यात आले. सेबीने निर्बंध लादल्यानंतरही लोकांकडून गुंतवणूक स्वीकारल्याप्रकरणी मोतेवार यांच्यावर उस्मनाबाद पोलिस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा  दाखल करण्यात आला होता.  
 
याप्रकरणी समृद्ध जीवन फूड्स कंपनीसह महेश किसन मोतेवार यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात  होता. या सदंर्भात सेबीने गेल्या महिन्यात डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर पोलिसांनी या गुन्ह्यात त्यांच्या सहकाऱ्यांनाही आरोपी केले. 
 
महेश किसन मोतेवार, वैशाली मोतेवार, घनश्याम पटेल आणि राजेंद्र भंडारे यांच्यासह समृद्ध जीवन फूड्स कंपनीविरुद्ध भादंवि ४२०, १८८, १२० ब नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी सेबीचे सहायक महाव्यवस्थापक सचिन ए. सोनवणे (रा. सेबी भवन, बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स, मुंबई) यांनी फिर्याद दिली होती. 
 
काय आहे प्रकरण :
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ ऑक्टोबर २०१३ रोजी सेबीने कंपनीला गुंतवणूक न घेण्याबाबत नोटीस बजावली होती. कंपनीमार्फत ‘कलेक्टिव्ह इन्व्हेस्टमेंट स्कीम’द्वारे लोकांकडून आर्थिक गुंतवणूक तसेच ठेवी घेण्यात येत होत्या़. अशा प्रकारची गुंतवणूक घेण्यासाठी सेबीची परवानगी आवश्यक असते. ही परवानगी समृद्ध जीवनने घेतलेली नव्हती. त्यामुळे गुंतवणूक थांबविण्याचे आदेश सेबीने दिले होते. मात्र तरीही कंपनीने गुंतवणूक घेणे सुरूच ठेवले होते. त्यामुळे सेबीने कंपनीची चौकशी सुरू केली. चौकशीदरम्यान कंपनीचे ऑडिट बुक, अकाऊंट बुक ताब्यात घेतले होते. त्यात सेबीने बजावलेल्या आदेशाचे उल्लंघन करून लोकांकडून गुंतवणूक घेणे कंपनीने सुरूच ठेवल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे सेबीने या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. कंपनीचे प्रमुख महेश मोतेवार यांनाच या गुन्ह्यामध्ये आरोपी करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे.