शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
4
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
5
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
6
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
7
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
8
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
9
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
10
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
11
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
12
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
13
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
14
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
15
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
16
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
17
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
18
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
19
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
20
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
Daily Top 2Weekly Top 5

उदय योजनेत महावितरण सहभागी

By admin | Updated: October 8, 2016 04:33 IST

केंद्र शासनाने राज्य वीज वितरण कंपन्यांची कार्यक्षमता आणि आर्थिक सक्षमता वाढविण्यासाठी ‘उदय योजना’ सुरू केली

मुंबई : केंद्र शासनाने राज्य वीज वितरण कंपन्यांची कार्यक्षमता आणि आर्थिक सक्षमता वाढविण्यासाठी ‘उदय योजना’ सुरू केली असून, या योजनेत सहभागी होण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयानुसार, राज्य शासन, महावितरण आणि केंद्र शासनामध्ये शुक्रवारी त्रिपक्षीय करार झाला आहे.महावितरणकडून मिळालेल्या माहितीनुसार, केंद्राने २० नोव्हेंबर २०१५ रोजी उदय योजना सुरू केली. ४ आॅक्टोबर २०१६ रोजी औरंगाबाद येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेत राज्य शासनाने सहभागी व्हावे; यासाठीची मान्यता मिळाली. उदय योजनेंतर्गत महावितरणकडे ३० सप्टेंबर २०१५ रोजी असणाऱ्या मध्यम व लघू मुदतीच्या कर्ज रकमेच्या ७५ टक्के रक्कम म्हणजे सुमारे ४ हजार ९६० कोटी रकमेचे कर्जरोखे बाजारात उभे केले जातील; आणि त्यायोगे स्वस्त दराने प्राप्त होणारे भांडवल राज्य शासनाकडून महावितरणला अनुदान स्वरूपात देण्यात येईल. शिवाय राज्य शासन या आर्थिक वर्षांपासून पुढील ५ वर्षे म्हणजे २०२०-२१पर्यंत पाच समान हप्त्यांमध्ये ९९२ कोटी अनुदान महावितरणला दरवर्षी देणार असून, यालाही मान्यता मिळाली आहे. याच संदर्भातील त्रिपक्षीय करार शुक्रवारी राज्य शासन, महावितरण आणि केंद्रामध्ये करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)>वीज वितरण हानी कमी करणे, विद्युत पायाभूत सुविधांची श्रेणीवाढ करणे, बिलिंगची कार्यक्षमता वाढविणे, विद्युतभाराचे व्यवस्थापन करून विजेच्या मागणीचे नियोजन करणे हे मुद्दे समोर ठेवून ही योजना आखण्यात आली आहे.