शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

महात्मा फुले यांची पगडी आयुष्यातील सर्वोच्च मानबिंदू

By admin | Updated: April 12, 2015 00:39 IST

पगडी डोक्यावर ठेवणे म्हणजे एका अर्थाने प्रकाश पाडणे. अनेक पगड्या डोक्यावर असतात किंवा त्या दुसऱ्याच्या डोक्यावर घातल्या जातात.

पुणे : पगडी डोक्यावर ठेवणे म्हणजे एका अर्थाने प्रकाश पाडणे. अनेक पगड्या डोक्यावर असतात किंवा त्या दुसऱ्याच्या डोक्यावर घातल्या जातात. आता पगड्या डोक्यावर ठेवण्याचा जणू धंदाच झाला आहे. पण महात्मा फुले यांच्या पगडीला एक विशिष्ट अर्थ आहे, त्यांची पगडी हा माझ्या आयुष्यातील सर्वोच्च मानबिंदू असल्याची भावना प्रसिद्ध नाटककार आणि दिग्दर्शक अतुल पेठे यांनी शनिवारी येथे व्यक्त केली. पुणे महानगरपालिका कामगार युनियनच्या वतीने अतुल पेठे यांना ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे यांच्या हस्ते पहिला ‘सत्यशोधक’ पुरस्कार देऊन आणि महात्मा फुले यांची पगडी अर्पण करून सन्मानित करण्यात आले. ५१ हजार रुपये रोख आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. त्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते प्रा. हरी नरके, रोहिणी पेठे, कामगारनेत्या मुक्ता मनोहर, युनियनचे अध्यक्ष उदय भट आणि युनियनचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते. हा माझ्या आयुष्यातील सर्वोच्च क्षण असून, जीवन सार्थक झाल्यासारखे वाटत असल्याचे सांगून पेठे म्हणाले, खूप वर्षांपूर्वी एसीझेडवर ‘अराजकाची नांदी’ हा माहितीपट बनविला आणि त्यातून सर्वसामान्यांचे प्रश्न कॅमेऱ्याच्या कॅनव्हासमधूनसुद्धा समोर आणता येतात, याची प्रचिती आली. विकासाचा डांगोरा विवेकाच्या वृत्तीमधून पिटला जात शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावल्या जातात, तेव्हा शेतकऱ्यांची अवस्था बांडगुळासारखी होते, हे जवळून पाहता आले. पण विकास झाला का? हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच राहिला. ‘कचराकुंडी’ मधून सफाई कामगारांच्या जीवनाचा वेध घेताना मी नक्की कुठे जगतो आहे, हा प्रश्न मला पडला. कॅमेऱ्यातून त्यांचे जीवन टिपताना मी स्वत:लाच त्यामध्ये पाहायला लागलो. त्यातून माझे आयुष्यच बदलले. ‘सत्यशोधक’ नाटकाद्वारे डोक्यावरून मैला वाहणाऱ्या सफाई कामगारांच्या माथ्यावर सांस्कृतिकतेचे नवे आयाम वसले. हा वास्तववाद जवळून पाहिल्यानंतर आज माझी ओळख नव्याने लोकांना सांगतो. माझे वडील महात्मा फुले, आई सावित्रीबाई फुले, काका महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत, असे त्यांनी सांगताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. नव्या काळात युनियन मोडकळीस येणार असून, मूठ तोडून विभाजन कसे करायचे याचे राजकारण होणार आहे. मात्र विचलित न होता त्याविरूद्ध लढायचे कसे? याचा विचार करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)जगातील सर्वच क्रांत्या या सामाजिक आणि सांस्कृतिक पायावर उभ्या राहिल्या आहेत. भारतीय क्रांतीचे प्रेरणास्थान हे महात्मा ज्योतिबा फुले होते. मात्र गेल्या 50 वर्षात आपला देश माकर््स-फुले-शाहू-आंबेडकरांच्या परंपरेला मुकला असून, देशाच्या इतिहासाची मीमांसा योग्यरितीने झालेली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. तसेच ‘सत्यशोधक’ हे नाटक अन्य प्रादेशिक भाषांमध्ये व्हावे आणि भारतातील सर्व साहित्यिक आणि कलावंत यांना एकत्र आणून त्यांचे संमेलन भरविले जावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.- रावसाहेब कसबे कन्नड भाषेत ‘सत्यशोधक’ येणार?४कर्नाटकातील हेगडू या गावातील जन गण मन दाता संस्था ‘ सत्यशोधक’ हे नाटक कन्नड भाषेत करू इच्छित आहे, त्यासाठी त्यांचे मला आमंत्रण आले असून, महात्मा फुले नव्याने मांडता येतील का? हे पहायचे आहे असे सांगत आपल्या पुरस्काराची रक्कम या संस्थेला प्रदान करीत असल्याचे अतुल पेठे यांनी जाहीर केले.