शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

महाराष्ट्राचा धर्मनिरपेक्ष नेता हरपला

By admin | Updated: December 3, 2014 03:38 IST

इंदिराजींच्या पडत्या काळात त्यांना भक्कम साथ दिली. राज्यसभेत त्यावेळी ते काँग्रेसचा किल्ला समर्थपणे लढवत असत.

मुंबई : ९ फेब्रुवारी १९२९ रोजी जन्मलेले अंतुले पाच दशकांहून अधिक काळ सक्रिय राजकारणात राहिले. आमदार, खासदार, मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री अशी त्यांची चढती राजकीय कारकीर्द राहिली. १९८० मध्ये ते मुख्यमंत्री झाले तेव्हा राज्यसभेचे सदस्य होते. विधानसभेच्या पोटनिवडणुकीत ते १ लाख ३० हजार मतांनी निवडून आले होते. महाराष्ट्रातील पहिले मुस्लिम मुख्यमंत्री बनण्याचा मान अंतुले यांना मिळाला, पण उक्ती आणि कृतीतून त्यांनी नेहमीच धर्मनिरपेक्ष प्रतिमा जपली. त्यांच्या अवतीभोवती कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील लोकांचा मोठा गोतावळा असे. इंदिरानिष्ठ म्हणून त्यांची ओळख होती. १९६९ मध्ये काँग्रेस पक्षात फूट पडली तेव्हा ते इंदिराजींसोबत राहिले. इंदिराजींच्या पडत्या काळात त्यांना भक्कम साथ दिली. राज्यसभेत त्यावेळी ते काँग्रेसचा किल्ला समर्थपणे लढवत असत.> वरदान ठरलेली ‘पोलिओ मोहीम’तात्कालीन कुलाबा लोकसभा मतदारसंघातून ते सलग दोन वेळा निवडून गेले. त्यांच्या या खासदारकीच्या काळात जून १९९५ ते मे १९९६ या काळात ते केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री होते. आरोग्य मंत्रिपदाच्या काळातील त्यांनी नवी पिढी पोलिओमुक्त करण्याचा विडा उचलला आणि देशात अमलात आणलेली ‘पल्स पोलीओ मोहीम’ ही वरदान ठरली. च्आरोग्य मंत्रिपदाबरोबरच त्यांच्याकडे जलस्त्रोत मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार होता. १९९६ मध्ये ११व्या तर २००४ मध्ये १४व्या लोकसभेत देखील ते कुलाबा (रायगड) लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात अंतुले अल्पसंख्याक विभागाचे केंद्रीय मंत्री होते. २००९ साली अंतुले यांनी लोकसभेची शेवटीची निवडणूक लढविली होती. त्यानंतर राजकारणापासून ते अलिप्त झाले होते.>वादग्रस्त कारकिर्दसिमेंटच्या मोबदल्यात इंदिरा गांधी यांच्या प्रतिभा प्रतिष्ठानला बिल्डरांकडून देणग्या घेतल्याचा आरोप त्यांच्यावर झाला आणि याच सिमेंट प्रकरणामुळे अंतुले यांना मुख्यमंत्रिपदावरून पाय उतार व्हावे लागले होते. त्यानंतर १९८५ मध्ये ते पुन्हा आमदार म्हणून निवडून आले आणि १९८९ पर्यंत आमदार होते.शहीद हेमंत करकरे यांच्या मृत्यूला मालेगाव बॉम्बस्फोटाच्या तपासाशी जोडल्याने अंतुले पुन्हा एकदा वादात पडले होते. २००९ मध्ये अंतुलेंनी शेवटची निवडणूक रायगडमधून लढवली. शिवसेनेचे अनंत गिते यांनी अंतुले यांचा पराभव केला़ त्यानंतर त्यांनी सक्रि य राजकारणातून संन्यास घेतला. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी पंतप्रधान पदास राहुल गांधी व नरेंद्र मोदी हे दोघेही योग्य नसल्याचे भाष्य केले होते.