शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राला विजेतेपद

By admin | Updated: January 13, 2015 00:18 IST

राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धा : पुरूष-महिला दोन्ही गटांत बाजी; मध्य प्रदेश दुसऱ्या स्थानी

सांगली : बजरंग पकड, बगली अशा थरारक कसरती करून मल्लखांबावर वर्चस्व मिळत महाराष्ट्राच्या पुरूष व महिला दोन्ही संघांनी विजेतेपद पटकावले. अनुभवी मध्य प्रदेशच्या संघास मात्र दुसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले. पारितोषिक वितरण मिरजेचे आ. सुरेश खाडे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी मनोहर सारडा होते. आ. खाडे म्हणाले, देशी खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक ती मदत मी करेन. मल्लखांब, जिम्नॅस्टिक, अ‍ॅक्रोबॅटीक्स आदी खेळांनी सांगलीचे नाव उंचावले आहे. जिल्हा क्रीडाधिकारी युवराज नाईक यांनी स्वागत केले़ डॉ़ सुहास व्हटकर व शिवाजी त्रिमुखे यांनी सूत्रसंचालन केले़ शिवाजी सगरे यांनी आभार मानले़ यावेळी मुंबईचे क्रीडाधिकारी सुहास व्हनमाने, महेश पाटील, सुधाकर जमादार, उमेश बडवे, बी़ शंकर, मुन्ना आलासे, प्रशांत पवार, युवराज खटके, उमेश सूर्यवंशी, श्रीकांत कुंभार, अक्रम मुजावर, जुबेर समलेवाले, माया खटके आदी उपस्थित होते़ जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय, सांगली जिल्हा अ‍ॅमॅच्युअर मल्लखांब असोसिएशन व तरुण भारत व्यायाम मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ६० व्या शालेय राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, आ. सुरेश खाडे, आ. सुधीर गाडगीळ, आ. शिवाजीराव नाईक, आ. विलासराव जगताप, आ. सुरेश हळवणकर आदींनी या स्पर्धेसाठी सहकार्य केले. (क्रीडा प्रतिनिधी)स्पर्धेचा निकाल व गुण पुरूष : महाराष्ट्र : प्रथम (४५.३०); मध्य प्रदेश : द्वितीय (४३.३०); विद्या भारती : तृतीय (१९.६५), गुजरात : चतुर्थ (१८.६५)महिला : महाराष्ट्र : प्रथम (४४.३५), मध्य प्रदेश : द्वितीय (२९.३५)विद्या भारती : तृतीय (२९.२०), गुजरात : चतुर्थ (२६.१०)वैयक्तीक : पुरुष सागर ओहोळकर : महाराष्ट्र : प्रथम (१६.४५), सुशांत पाटील : महाराष्ट्र : द्वितीय (१५.५७), राजवीर पानवार : तृतीय : मध्य प्रदेश (१५.०५), मनिष पानवार : चतुर्थ : मध्य प्रदेश (१४.६२)वैयक्तिक : महिला, पूनम शर्मा : महाराष्ट्र : प्रथम (१५.३०)मृणाल सैतवडेकर : महाराष्ट्र : द्वितीय (१५.१५), वैष्णवी जहागीरदार : सीबीएसई : तृतीय (१४.५५), मुस्कान बाकोडीया : मध्य प्रदेश : चतुर्थ (१३.६५).राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेत विजेतेपद मिळवलेल्या महाराष्ट्र संघास आ. सुरेश खाडे यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले. यावेळी जिल्हा क्रीडाधिकारी युवराज नाईक, बापू समलेवाले, तानाजी घार्गे, दीपक सावंत, डॉ. सुहास व्हटकर, शिवाजी त्रिमुखे, सुहास व्हनमाने, महेश पाटील, शिवाजी सगरे, आदी उपस्थित होते.