शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
2
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
3
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
4
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
5
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
6
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
7
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
8
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
9
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
10
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
11
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
12
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
13
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
14
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
15
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
16
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
17
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
18
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल
19
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
20
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?

४७ टक्के खर्चासह महाराष्ट्र सरकार ठरले ‘सेकंड क्लास’!

By admin | Updated: March 7, 2017 04:52 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार अर्थसंकल्पीय निधीच्या खर्चाबाबत मात्र केवळ सेकंड क्लासमध्ये पास झाले

यदु जोशी,मुंबई- विविध क्षेत्रात चौफेर विकासाचा दावा करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार अर्थसंकल्पीय निधीच्या खर्चाबाबत मात्र केवळ सेकंड क्लासमध्ये पास झाले आहे. २०१६-१७ च्या एकूण निधीपैकी केवळ ४७ टक्केच निधी या सरकारला आजअखेर खर्च करता आला आहे. उत्पन्नाच्या आघाडीवर न मिळालेले अपेक्षित यश, आचारसंहितेमुळे खर्चावर आलेली मर्यादा आणि निधीचे वितरण होऊनही खर्चाबाबत विविध विभागांची उदासिनता यामुळे वित्तीय शिस्तीचा बोजवारा उडाल्याने चालू अधिवेशनात सरकारला विरोधकांच्या टिकेला सामोरे जावे लागणार आहे. महसूल आणि वने, सार्वजनिक बांधकाम, उद्योग, गृहनिर्माण, पाणीपुरवठा,अल्पसंख्यांक विकास, आदिवासी विकास, पर्यटन आदी विभागांना खर्चाच्या टक्केवारीची पन्नाशीही अद्याप गाठता आलेली नाही. सार्वजनिक बांधकाम खात्याचे घोडे तर बारा टक्क्यांवरच अडले आहे. ७० टक्क्यांपेक्षा अधिक खर्च करणाऱ्या विभागांमध्ये गृह, कृषी, शालेय शिक्षण, वैद्यकीय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य आदी विभागांचा समावेश आहे. सामाजिक न्याय विभाग ५५ टक्के, महिला व बालकल्याण विभाग ६० टक्क्यांवर आहे. नोटाबंदीच्या निर्णयामुळे मुद्रांक शुल्कापासूनचे अपेक्षित उत्पन्न मार्चअखेर जवळपास दोन हजार कोटी रुपयांनी घटेल असा अंदाज वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. या शिवाय, नोटाबंदी आणि महामार्गांलगतचे बीअरबार बंद करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा फटका बसून साधारणत: लक्ष्यापेक्षा २ हजार कोटी रुपये उत्पादन शुल्क सरकारला कमी मिळेल, अशी शक्यता आहे.>बजेटला १५ टक्के कट!२०१६-१७ च्या अर्थसंकल्पाला १० ते १५ टक्के कट लावला जाईल, अशी परिस्थिती आहे. उत्पन्नाचे उद्दिष्ट न गाठता आल्याने मुख्यत्वे हा कट सरकारला लावावा लागेल, असे ज्येष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मुख्यत्वे महसुली खर्चाला हा कट लागेल. जिल्हा नियोजन समिती, आमदार निधी मात्र १०० टक्के वितरित करण्यात आला आहे. अर्थसंकल्पातील नियोजन खर्चाची ८० टक्के रक्कम तर नियोजनबाह्य खर्चाची ९० टक्के रक्कम वितरित करण्यात आली आहे. >११ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या पुरवणी मागण्या एक दिवस अर्थसंकल्पापेक्षा मोठ्या रकमेच्या होतील का,अशी बोचरी टीका विरोधी पक्षात असताना करणाऱ्या सध्याच्या सरकारनेही या मागण्यांबाबत कोटीच्या कोटी उड्डाणे घेणे सुरूच ठेवले आहे. वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज तब्बल ११ हजार १०४ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या विधानसभेत सादर केल्या. त्यावर ८ आणि ९ मार्चला सभागृहात चर्चा होणार आहे. कृषी पंपधारक शेतकरी, यंतर्मागधारक तसेच विविध वीज ग्राहकांना दिलेल्या अर्थसहाय्यावरील खर्चासाठी २ हजार ८०४ कोटी ७२ लाख रूपयांची तरतूद पुरवणी मागणीत आहे. मार्चमध्ये राज्याचा संपूर्ण वर्षभरासाठीचा अर्थसंकल्प सादर केला जातो. त्यानंतर अतिरिक्त योजना व खर्चासाठी विविध विभागाकडून येणाहृया प्रस्तावानुसार पुढील अधिवेशनात पुरवणी मागण्या मांडल्या जातात. परंतु गेल्या काही वर्षात पुरवणी मागण्यांचे आकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढले असून यामुळे नियोजनातील उणविा चव्हाट्यावर येत आहेत. २०१५-१६ या आर्थिक वर्षात सरकारने ३५,३७४ कोटी रु पयांच्या तर चालू आर्थिक वर्षात ३३ हजार ५९३ कोटी रु पयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या आहेत.>३०५२ शेतकऱ्यांची आत्महत्याराज्यात जानेवारी ते डिसेंबर २०१६ या वर्षभरात तब्बल ३०५२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची बाब शासनानेच प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीतून पुढे आली आहे. या पार्श्वभूमीवर आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबियांना अर्थसहाय्य करण्यासाठी मोठी तरतूद करावी लागली आहे. मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना अर्थ साहाय्य देण्यासाठी १७ कोटी ३१ लाख ९३ हजार रु पये निधी उपलब्ध करून देणे आवश्यक असताना केवळ ३ कोटी २४ लाख रु पयांची तरतूद असल्याने पुरवणी मागण्यात १४ कोटी ७ लाख ७८ हजार रु पयांची तरतूद आहे.>राज्य आर्थिक संकटातराज्याची आर्थिक परिस्थिती नाजूक असताना सरकार हजारो कोटींच्या घोषणा करीत आहे. एकीकडे घोषणांचा डोंगर दुसरीकडे विकास योजनांना कात्री, अशी परिस्थिती आहे. सातवा वेतन आयोग डोक्यावर आहे. उत्पन्नाचा मेळ साधता आलेला नाही. या सरकारच्या काळात राज्य कमालीच्या आर्थिक संकटात सापडले आहे.-जयंत पाटील, माजी वित्तमंत्री.