गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. काही दिवसांपासून राज्यात सातत्यानं मोठ्या प्रमाणात रुग्णवाढ होत आहे. दरम्यान, गेल्या चोवीस तासांत राज्यात ६८ हजार ६३१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर ५०३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध लादण्यात आले असले तरी सध्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होताना दिसत नाही. गेल्या चोवीस तासांत राज्यात ६८ हजार ६३१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर ४५ हजार ६५४ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं. तर गेल्या चोवीस तासांत ५०३ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
Coronavirus : राज्यातून पुन्हा धडकी भरवणारी रुग्णसंख्या; चोवीस तासांत ६८,६३१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2021 21:31 IST
Coronavirus : मुंबईत गेल्या चोवीस तासांत ८,४७९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद
Coronavirus : राज्यातून पुन्हा धडकी भरवणारी रुग्णसंख्या; चोवीस तासांत ६८,६३१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद
ठळक मुद्देमुंबईत गेल्या चोवीस तासांत ८,४७९ नव्या कोरोनाबाधितांची नोंदराज्यात सध्या सहा लाखांपेक्षा अधिक सक्रिय रुग्ण