शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

देशात महाराष्ट्रच अग्रेसर; मुख्यमंत्र्यांची ग्वाही

By admin | Updated: May 1, 2016 01:57 IST

महाराष्ट्र विकासाच्या बाबतीत आजही क्रमांक एकवर आहे. महाराष्ट्राचे मॉडेल अधिक प्रभावी असून केंद्र सरकारनेही आता याच मॉडेलचा स्वीकार केला आहे. त्यामुळे यापुढेही महाराष्ट्रच नंबर

मुंबई : महाराष्ट्र विकासाच्या बाबतीत आजही क्रमांक एकवर आहे. महाराष्ट्राचे मॉडेल अधिक प्रभावी असून केंद्र सरकारनेही आता याच मॉडेलचा स्वीकार केला आहे. त्यामुळे यापुढेही महाराष्ट्रच नंबर एक राहणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येस दिली. विविध क्षेत्रांत मूलगामी परिवर्तन घडविण्यासह सर्व समाजघटकांच्या आकांक्षांची पूर्तता करण्यासाठी सरकार जाणिवेने प्रयत्नशील आहे. यंदा राज्यापुढे दुष्काळ आणि पाणीटंचाईचे आव्हान असले तरी त्याचा मुकाबला करण्यासाठी सरकार सर्वशक्तीनिशी प्रयत्न करीत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. जलसंधारणातून पाणलोट क्षेत्राचा विकास करून विकेंद्रित पाण्याचे साठे तयार करण्यावर सरकारचा भर आहे. आतापर्यंत केवळ पैसे खर्च केले, मात्र पाणलोटाचा विकास झाला नाही. शिवाय, धरणांमुळे दुष्काळमुक्ती शक्य नाही. त्यामुळे पाणलोट क्षेत्रातील महत्त्वाची कामे करावी लागणार आहेत. वैद्यकीय प्रवेशाबाबत विद्यार्थ्यांसमोर निर्माण झालेल्या संभ्रमाबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, नीट परीक्षा लागू करून सरकार कुठल्याही स्थितीत राज्यातील विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ देणार नाही. २०१८ पासून नीट परीक्षा लागू करावी, अशी मागणी राज्य सरकार सुप्रीम कोर्टात करणार आहे. यासाठी फेरविचार याचिका दाखल करण्यात येणार आहे.