शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
2
उद्धव ठाकरेंना राहुल गांधींच्या घरी मागे बसवलं? संजय राऊत म्हणाले, "आम्हाला स्क्रीन समोर बसून पाहताना..."
3
मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली...
4
सुप्रीम कोर्टाचा १ निर्णय अन् अलाहाबाद हायकोर्टचे १३ न्यायाधीश नाराज; मुख्य न्यायाधीशांना पत्र
5
डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा...
6
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
7
तिसरा श्रावण शनिवार: तुमची साडेसाती सुरू आहे? अश्वत्थ मारुती पूजनासह ‘हे’ ५ शनि उपाय कराच!
8
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
9
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण; सेन्सेक्स १४५ आणि निफ्टी ५२ अंकांच्या घसरणीसह उघडले
10
आरोग्याचा विषय जास्त महत्त्वाचा; पण कबुतरांबाबतही जाणिवा दाखवा : मंत्री लोढा
11
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
12
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
13
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
14
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
15
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
16
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
17
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?
18
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
19
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
20
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न

‘महाराष्ट्र भूषण’वरून राष्ट्रवादीत खदखद!

By admin | Updated: August 21, 2015 01:25 IST

बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यावरून आ. जितेंद्र आव्हाड यांनी राज्यभर उभारलेल्या आंदोलनामुळे राष्ट्रवादीत मोठ्या प्रमाणावर खदखद सुरू झाली आहे

अतुल कुलकर्णी, मुंबई बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यावरून आ. जितेंद्र आव्हाड यांनी राज्यभर उभारलेल्या आंदोलनामुळे राष्ट्रवादीत मोठ्या प्रमाणावर खदखद सुरू झाली आहे. पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, अजित पवार यांच्या भिन्न भूमिका पाहता आम्ही नेमके करायचे तरी काय या प्रश्नाने ज्येष्ठ नेत्यांना ग्रासले आहे.पक्षातल्या अनेक ज्येष्ठ नेत्यांशी बोलल्यानंतर ही खदखद मोठ्या प्रमाणावर समोर आली आहे. आधी बाबासाहेबांना पुरस्कार जाहीर झाल्यानंतर अजित पवार यांनी पुरस्काराच्या बाजूने भूमिका घेतली. २ मे रोजी खा. सुप्रिया सुळे यांनी पुरंदरेंना अभिनंदनाचे पत्रही पाठवले. मात्र त्याच काळात आव्हाड सतत पुरंदरेविरोधी भूमिका घेत राहिले. त्यावर हे त्यांचे व्यक्तिगत मत आहे असे सांगणाऱ्या अजित पवार यांनी एकदम उलट भूमिका घेतली. तर शरद पवारांनी पुरंदरे इतिहास संशोधक नाहीत असे सांगितले. त्यावरून वाद रंगल्यानंतर आता हे वाद थांबवा असे विधान त्यांनीच केले. या सगळ्या पार्श्वभूमीवर आम्ही नेमके बोलायचे तरी काय?, प्रतिक्रिया तरी काय द्यायच्या? असे प्रश्न ज्येष्ठ नेत्यांपुढे निर्माण झालेत.पत्रकार सतत विचारणा करू लागले तेव्हा आव्हाड यांचे ते व्यक्तिगत मत आहे, असे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले. तर शरद पवार यांनीही या वादावर पडदा टाका असे स्पष्ट केले. तरीही माजी प्रदेश कार्याध्यक्ष आणि पक्षातर्फे मंत्रीपद मिळालेल्या आव्हाड यांनी ठाण्यात राष्ट्रवादीतर्फे राज्यभर शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर माफी आंदोलन केले. जर आव्हाड यांची ती व्यक्तीगत भूमिका होती तर पक्षातर्फे या विषयावर त्यांनी कोणाच्या परवानगीने आंदोलन केले? जर त्यांना परवानगी दिली असेल तर पुरंदरेंना विरोध ही आव्हाडांची व्यक्तीगत भूमिका कशी काय होते? आणि जर परवानगी मागितली नसेल तर त्यांनी पक्षाच्या नावावर केलेल्या आंदोलनामुळे पक्षशिस्त मोडली आहे असे मानले पाहिजे का? असे सवाल आता उपस्थित झाले आहेत.मध्यंतरी आव्हाड यांना संरक्षण देण्यावरुन शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले. नंतर पुरंदरे प्रकरण घडले. त्यातही शरद पवार यांनी केलेली विधाने पक्षआ. आव्हाड यांच्या पाठीशी उभा असल्याचे दाखवणारी ठरली. परिणामी आम्ही पक्षात नको असू तर आम्हाला तसे सांगून तरी टाकावे या शब्दात काही ज्येष्ठ नेत्यांनी आपल्या मनातली खदखद बोलून दाखवली.एकूणच पक्षात टोकाची नाराजी आहे. कोणी बोलून दाखवत नाही पण पुरंदरे प्रकरणात जे काही घडले त्याची गोळा बेरीज केली तर पक्ष म्हणून राष्ट्रवादीच्या पदरी अपयशच आले. पक्ष बॅकफूटवर गेला आणि त्यात पुन्हा पुरंदरे यांनी आपल्या पुरस्काराच्या १० लाखात स्वत:चे १५ लाख घालून सगळी रक्कम कॅन्सर रुग्णांना देऊ केली आणि भाषणात शिवाजी महाराजांसारखा जाणता राजा कसा कोळी, माळी, मराठा, मुस्लिम समाजातल्या लोकांना बरोबर घेऊन लढला याचे अनेक दाखले दिल्याने तर राष्ट्रवादीच्या आंदोलनावर पुरते पाणी पडल्याचे निष्कर्ष पक्षात काढले जात आहेत.