शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

‘महाबीज’ला बियाणे फरकाची रक्कम मिळणार!

By admin | Updated: July 6, 2016 01:36 IST

बियाणे विक्रीच्या फरकाची रक्कम ३0 जुलैपर्यंंत शेतक-यांना देण्यात येणार!

अकोला : महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाने (महाबीज) यावर्षी वाढीव दराने उपलब्ध केलेल्या बियाणे विक्रीच्या फरकाची रक्कम २८ कोटी रुपये असून, फरकाची ही रक्कम ३0 जुलैपर्यंंत शेतकर्‍यांना देण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. याकरिता १५ जुलैपर्यंंंत शेतकर्‍यांकडून माहिती गोळा केली जाणार आहे.मागील पाच-सहा वर्षांंंपासून पावसाच्या अनिश्‍चिततेचा सामना करणार्‍या शेतकर्‍यांना २0१५-१६ मध्ये भीषण दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागले. अशावेळी शेतकर्‍यांना सवलती देण्यात येतात, बियाण्यांवर अनुदान दिले जाते; परंतु ते तर मिळालेच नाही, उलट महाबीजने बियाण्यांचे दर ३५ टक्क्यांवर वाढविल्याने शेतकर्‍यांवर संकटच कोसळले. त्यामुळे प्रचंड आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी हवालदिल झाला. ही सर्व परिस्थिती बघता या शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी शासनाने मूग, उडीद व तूर बियाण्यांचे दर कमी करण्याचा आदेश महाबीजला दिला होता. महाबीजने तातडीने त्यांच्या विक्रेत्यांना पत्र पाठवून बियाणे दर कमी करू न जुन्याच दराप्रमाणे बियाणे विक्री करण्यासंबंधीचे पत्र पाठविले; परंतु तोपर्यंंंत बराच अवधी लोटल्याने जवळपास सर्वच शेतकर्‍यांनी बियाणे खरेदी केले. त्यामुळे ज्या शेतकर्‍यांनी वाढीव दराने मूग, उडीद व तुरीचे बियाणे खरेदी केले, त्या शेतकर्‍यांना जुन्या व नवीन दरातील फरकाची रक्कम देण्यात येणार आहे.याकरिता १५ जुलैपर्यंंंत शेतकर्‍यांनी खरेदी केलेले बियाणे गोणी, त्यावरील टॅग, बँक खाते व त्या खात्यांचा आयएसएससी कोड, तालुका, जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय, संबंधित बियाणे विक्रेते व महाबीजकडे उपलब्ध करू न द्यायचे आहेत. शेतकर्‍यांनी दिलेल्या या कागदपत्रांची छाननी केली जाणार असून, ३0 जुलैपर्यंंंत शेतकर्‍यांना ही फरकाची रक्कम अदा केली जाणार असल्याचे वृत्त आहे.आता २८ कोटींची प्रतीक्षामहाबीजने विक्री केलेल्या बियाण्यांच्या फरकाची रक्कम २८ कोटी रुपये आहे. पण, ही रक्कम अद्याप शासनाकडून प्राप्त झाली नसल्याने महाबीजलाही या रकमेची प्रतीक्षा आहे.