शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कामोठे पोलीस ठाण्यात माथेफिरूचा धुडगूस

By admin | Updated: October 17, 2016 02:31 IST

कामोठे पोलीस ठाण्यात आणलेल्या माथेफिरूने कामोठे पोलीस ठाण्यातील सामानाची मोठ्या प्रमाणात तोडफोड केल्याची घटना शनिवारी दुपारी घडली.

कळंबोली : कामोठे पोलीस ठाण्यात आणलेल्या माथेफिरूने कामोठे पोलीस ठाण्यातील सामानाची मोठ्या प्रमाणात तोडफोड केल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. आनंद सरगर (३२) कामोठे येथील रहिवासी असून सेक्टर २१ मध्ये कुटुंबासोबत राहतो. शनिवारी सकाळी घरात किरकोळ वादावादी करून सरगर घराबाहेर पडला. घराबाहेर पडल्यानंतर रस्त्यावरील दगड फेकून त्याने पादचाऱ्यांना मारहाण केली. याशिवाय परिसरातील कामोठे पोलीस ठाण्यातील गाड्यांवर तसेच इमारतीवरही दगडफेक केली. हा प्रकार पोलीस ठाणे येथील पोलीस कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर पोलिसांनी सरगर यास पोलीस ठाण्यात पकडून आणले. त्यावेळी त्याने पोलीस ठाण्याबाहेर ठेवलेल्या कुंड्यांची तोडफोड केली. पोलीस ठाण्यात घेऊन गेले असता खुर्च्या, कपाटाच्या काचाही फोडल्या. टेबलावरील कागदपत्रे अस्ताव्यस्त केली. त्यामुळे त्यास रस्सीने बांधून ठेवण्यात आले होते. यासंदर्भात सरगरच्या नातेवाइकांनाही कळवण्यात आले. तेव्हा त्याला वारंवार असे झटके येत असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती त्याच्या नातेवाइकांनी पोलिसांना दिली. त्यामुळे त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा नोंद केला नाही. (वार्ताहर)