शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

म्हैसाळ गर्भपात केंद्राचे माधवनगर ‘कनेक्शन’

By admin | Updated: March 7, 2017 23:48 IST

औषधांचा पुरवठा : सोमवार पेठेतील गोदामावर छापा; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

सांगली : म्हैसाळ (ता. मिरज) येथील डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे याच्या गर्भपात केंद्राचे माधवनगर (ता. मिरज) ‘कनेक्शन’ असल्याची धक्कादायक माहिती मंगळवारी उघडकीस आली. माधवनगरमधील एका व्यापाऱ्याने गर्भपात करण्यासाठी खिद्रापुरेच्या रुग्णालयात औषधांचा पुरवठा केल्याचे निष्पन्न झाले आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाने मंगळवारी रात्री उशिरा या व्यापाऱ्याच्या गोदामावर छापा टाकला. मध्यरात्रीपर्यंत पोलिसांची मदत घेऊन गोदामाची तपासणी सुरु होती. यासंदर्भात अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी कारवाई सुरु आहे. ती पूर्ण झाल्याशिवाय माहिती देता येणार नाही, असे सांगून अधिक बोलण्याचे टाळले. माधवनगरचा हा व्यापारी औषधांची होलसेल विक्री करतो. गर्भपातासाठी लागणाऱ्या औषधी गोळ्या व इंजेक्शनचा त्याने पुरवठा केल्याचे अटकेत असलेल्या खिद्रापुरेच्या चौकशीत स्पष्ट झाले. त्यानंतर तातडीने व्यापाऱ्याच्या सोमवार पेठेतील गोदामावर छापा टाकला. मोठ्या प्रमाणात औषध व इंजेक्शन साठा हाती लागला असल्याचे समजते. व्यापाऱ्याचे साखर कारखाना परिसरात औषध दुकानही आहे. या व्यापाऱ्यास ताब्यात घेण्यात आले आहे. म्हैसाळ येथे खिद्रापुरेचे गर्भपात केंद्र असल्याचे उघडकीस आले आहे. पोलिस व वैद्यकीय पथकाने संयुक्तपणे सोमवारी त्याच्या रुग्णालयावर छापा टाकला होता. या छाप्यात गर्भपात करण्यास लागणाऱ्या औषधी गोळ्या व इंजेक्शन सापडली होती. ही औषधे महागडी आहेत. ती सांगली जिल्ह्यातून पुरविली असावीत, असा पोलिसांना संशय होता. त्याद्दष्टीने तपास सुरु ठेवला होता. तोपर्यंत फरारी असलेला खिद्रापुरे सोमवारी रात्री पोलिसांना शरण आला. त्यामुळे औषधांचा पुरवठा कोठून झाला, याचा तपास करण्यास गती मिळाली. मावधनगर येथे व्यापाऱ्याच्या गोदामावर छापा टाकल्याचे वृत्त पसरताच सोमवार पेठेत गर्दी होती. (प्रतिनिधी)आरोग्यमंत्री आज म्हैसाळमध्ये सार्वजनिक आरोग्यमंत्री दीपक सावंत बुधवारी सांगली दौऱ्यावर आहेत. सकाळी दहा वाजता ते म्हैसाळ येथे डॉ. खिद्रापुरे याच्या रुग्णालयास भेट देऊन पाहणी करणार आहेत. तपासाची माहिती घेणार आहेत.